29 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरराजकारणपोलिस खुश, शिंदे-फडणवीस सरकारने ही योजना पुन्हा केली सुरू

पोलिस खुश, शिंदे-फडणवीस सरकारने ही योजना पुन्हा केली सुरू

Google News Follow

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र पोलिसांना मोठं गिफ्ट दिलं आहे. फडणवीस यांनी कॉन्स्टेबल दर्जाच्या अधिकाऱ्यांना खात्यातूनच मिळणारी कर्ज सेवा पून्हा सुरू केली आहे. ठाकरे सरकारने ही योजना बंद केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, डीजी कर्ज खात्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना गृह विभागाकडूनच वीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारने ही योजना बंद केल्याने पोलिसांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे पोलिसांनी ही योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी करत होते. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात

इस्रायल सीरियामध्ये युद्धाचे ढग

देश बदलणारं ‘फिझंट आयलंड’

सर्वोत्कृष्ट मंडळाला मिळणार पाच लाख

दरम्यान, नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीडीडी चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलिसांना पंधरा लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे देण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या पाच दिवसांत शासन निर्णय मंगळवारी गृहनिर्माण विभागाने जाहीर केला. त्यामुळे घराच्या प्रतिक्षेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा