27 C
Mumbai
Monday, September 26, 2022
घरदेश दुनियादेश बदलणारं 'फिझंट आयलंड'

देश बदलणारं ‘फिझंट आयलंड’

Related

माणसं देश बदलतात. त्यामागे अनेक कारणं असतात. नोकरी, उद्योग, शिक्षण अशी अनेक कारणं असतात. लोक दुसऱ्या देशात जातात आणि अनेकदा तिथेच स्थायिक होतात. जगात असंच एक बेटसुद्धा आहे. जे देश बदलतं. ते बेट म्हणजे फिझंट आयलंड.

फिझंट आयलंड फ्रान्स आणि स्पेन या दोन देशांच्यादरम्यान आहे. स्पेन आणि फ्रान्सला वेगळं करणारी बिदासो नदी आहे आणि या नदीच्या मध्यभागी हे बेट आहे. त्यामुळे हे बेट नक्की कोणाचं म्हणजे फ्रान्सचं की स्पेनचं असा प्रश्न उभा ठाकला होता. या प्रश्नावर स्पेन आणि फ्रान्सने सुवर्णमध्य काढला आहे. या दोन देशांनी आपापसात एक करार केला आहे. सहा महिने बेट फ्रान्सकडे राहिल आणि सहा महिने बेट स्पेनकडे राहील. या करारानुसार हे दोन्ही देश सहा महिन्यांच्या अंतराने या बेटाची देवाणघेवाण करतात.

बेट नक्की कुठे आहे?

फ्रेंचचं हेन्ड्ये हे शहर सीमाभागातलं शेवटचं शहर आहे आणि दुसरीकडे स्पेनमधलं होंडारीबिया हे सीमाभागातल शेवटचं शहर आहे. या दोन देशांची नैसर्गिक सीमा म्हणजे बिदासो नदी आणि या नदीच्या मध्यभागी शांत, दुर्गम, झाडांचं आच्छादन असलेलं फिझंट बेट आहे. या बेटाचं क्षेत्रफळ हे साधारण दीड एकर आहे.

बेटाचा इतिहास काय आहे?

सध्या फिझंट आयलंड हे एक शांत ठिकाण आहे. पूर्वीच्या काळी फ्रान्स आणि स्पेन या दोन्ही देशांमध्ये या बेटाच्या मालकीसाठी वाद व्हायचे. ३० वर्ष हे वाद सुरू होते. त्यानंतर हे वाद संपावे, त्यातून काही मार्ग निघावा म्हणून १६५९ मध्ये दोन्ही देशांमध्ये एक करार झाला होता. फ्रान्स आणि स्पेनच्या प्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हा एक शांतता करार केला, ज्याला ‘पायरेनीजचा करार’ म्हणतात. या करारानुसार सीमा निश्चित केल्या गेल्या आणि करार शाही विवाहाने पूर्ण झाला. ज्यामध्ये फ्रान्सचा राजा लुई चौदावा याने स्पेनचा राजा फिलिप चौथा याच्या मुलीशी लग्न केलं. म्हणजे या बेटाच्या अधिकारांची देवाणघेवाण ही साधारण साडे तीनशे वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे पायरेनीज करारानुसार १ फेब्रुवारी ते ३१ जुलै पर्यंत हे बेट स्पेनच्या मालकीचं असतं आणि उरलेले सहा महिने म्हणजेच १ ऑगस्ट ते ३१ जानेवारीपर्यंत ते फ्रान्सकडे राहतं. ऐतिहासिक महत्त्व नक्कीच या बेटाला आहे आणि ते म्हणजे फ्रेंच आणि स्पॅनिश सम्राटांमधल्या बैठका, कैद्यांची देवाणघेवाण करण्यासाठी या ठिकाणाचा वापर केला जात होता, अशी माहिती आहे.

हे ही वाचा:

सर्वोत्कृष्ट मंडळाला मिळणार पाच लाख

जेष्ठ नागरिकांचा ‘त्या’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार

बीसीसीआय म्हणजे ‘क्रिकेट की दुकान’

सध्या या फिझंट आयलंडचं अस्तित्व धोक्यात आलंय. पाण्याचा जोरदार प्रवाह आणि बेटाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे फिझंट बेटाचा सुमारे अर्धा भाग नष्ट झाला आहे. त्यामुळे या बेटाची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर हे ऐतिहासिक महत्त्व असणारं अनोखं बेट काळाच्या ओघात नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या बेटावर सध्या कोणाला सोडत नाहीत पण काही महत्त्वाच्या दिवशी हे बेट काही काळासाठी खुलं केलं जातं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,943अनुयायीअनुकरण करा
40,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा