29 C
Mumbai
Monday, October 2, 2023
घरविशेषआजपासून 'या' नियमांत होताहेत मोठे बदल

आजपासून ‘या’ नियमांत होताहेत मोठे बदल

Google News Follow

Related

आजपासून सप्टेंबर महिना सुरू झाला असून महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक बदल लागू करण्यात आले आहेत. नव्या महिन्यापासून अनेक गोष्टी आणि नियमांमध्ये बदल झाले आहेत. बँकिंग नियम तसेच एलपीजीच्या किमतींमध्ये बदल या महिन्यांपासून बदल झाले आहेत.

आजपासून काय काय बदल होणार ते पुढील प्रमाणे आहेत

  • एलपीजीच्या किंमतीत बदल

एलपीजी गॅसच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. एलपीजी गॅसचे दर प्रति सिलिंडर शंभर रुपयांनी कमी झाले आहेत. इंडेनच्या १९ किलो व्यावसायिक सिलिंडर किंमतीत दिल्लीत ९१.५० रुपये, कोलकत्त्यात १०० रुपये, मुंबईत ९२.५० रुपये, चेन्नईत ९६ रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र ही कपात केवळ व्यवसायिक गॅस सिलिंडरच्याच दरात करण्यात आली आहे.

  • पीएम किसान योजना

प्रधानमंत्री किसान योजनेत निधी प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना e-KYC करण्यासाठी शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२२ निश्चित केली होती. या अटीची पूर्तता केली नसेल तर शेतकऱ्यांचा पुढील हप्ता मिळणार नसल्याचे म्हटले जात आहे.

  • आयआरडीएआयने जनरल इन्शुरन्समधील नियमांमध्ये बदल केले आहेत. त्या नियमांनुसार, एजंटच्या कमिशनमध्ये कपात करण्यात आली आहे. ३० ते ३५ टक्क्यांऐवजी एजंटला आता फक्त २० टक्के कमिशन मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना आता विमा स्वस्त मिळणार आहे.

हे ही वाचा:

दाऊदला पकडून देणाऱ्याला मिळणार २५ लाख

मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात

इस्रायल सीरियामध्ये युद्धाचे ढग

देश बदलणारं ‘फिझंट आयलंड’

  • पंजाब नॅशनल बॅंक आपल्या ग्राहकांना बऱ्याच काळापासून KYC अपडेट करण्यास सांगत आहे. केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट होती. त्यामुळे अजून तुम्ही KYC अपडेट केली नसेल तर जवळच्या बॅंकेशी संपर्क साधा अन्यथा तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
102,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा