28 C
Mumbai
Friday, September 17, 2021
घरक्राईमनामाअनिल परबांना ईडीची नोटीस! मंगळवारी हजर राहण्याचे आदेश

अनिल परबांना ईडीची नोटीस! मंगळवारी हजर राहण्याचे आदेश

Related

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमधील परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. मंगळवार, ३१ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश परब यांना देण्यात आले आहेत. सक्तवसुली संचालनालयातर्फे सध्या महाराष्ट्रातील १०० कोटी खंडणी प्रकरणाचा तपास केला जात आहे. याच तपासाच्या संदर्भात आता अनिल परब यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील शंभर कोटी वसुली प्रकरण हे चांगलेच गाजले होते. त्यासंदर्भात सरकार मधील गृहमंत्री अनिल देशमुख हे चांगलेच अडचणीत सापडले असून त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सक्तवसुली संचालनालयातर्फे या प्रकरणाचा तपस सुरु आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात अनिल परब यांच्या मालमत्तेचा तपास करून जप्तीची कारवाई सुद्धा करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

सीबीआयने म्हणे राहुल गांधींना अहवाल पाठवला, पोगो पाहणारेच यावर विश्वास ठेवतील!

अफगाणिस्तानात बँका बंद; सर्वसामान्यांकडे पैशांचा खडखडाट

अनिल देशमुखांना क्लिन चीट दिलेलीच नाही!

राज्यातील ‘आदर्श शिक्षक’ अजूनही पुरस्काराच्या प्रतीक्षेत

आता याच प्रकरणाशी संबंधित अनिल परब यांना देखील चौकशीसाठी हजार राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे शंभर कोटी वसुली प्रकरणामुळे महाराष्ट्र सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. तर अनिल परबांचे आता नेमके भवितव्य काय असणार? असाही सवालही उपस्थित होत आहे.

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी या विषयात प्रतिक्रिया दिली आहे. “शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र” असे राऊतांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,408अनुयायीअनुकरण करा
3,030सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा