29 C
Mumbai
Thursday, June 17, 2021
घर राजकारण कोविडमुळे कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना निवृत्ती वेतन, विमाभरपाई

कोविडमुळे कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना निवृत्ती वेतन, विमाभरपाई

Related

कोविडमुळे घरातील कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांसाठी मोदी सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. या कुटुंबांना आर्थिक साहाय्य मिळावे या दृष्टीने केंद्र सरकारकडून काही महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर केल्या गेले आहेत. या योजनांच्या माध्यमातून कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना निवृत्ती वेतन तसेच वाढीव आणि व्यापक स्वरूपाची विमाभरपाई देण्यात येणार आहे.

शनिवार, २९ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड महामारीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा जाहीर केल्या. त्यात अनाथ मुलांना पीएम केअरच्या माध्यमातून मदत जाहीर करण्यात आली तर कोविडमध्ये कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबीयांसाठीही आर्थिक सहाय्य देणाऱ्या महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

दहावी मूल्यांकन पद्धतीबाबत शाळा, पालक संभ्रमातच

कोविडमुळे निराधार झालेल्या मुलांसाठी सरसावले मोदी सरकार

बनावट ओळखपत्राच्या आधारे अभिनेत्रीचे लसीकरण

सराईत गुन्हेगार महिलेला धाडसी अधिकाऱ्याने रेल्वे अपघातातून वाचवले

केंद्र सरकारने जाहीर केल्या या महत्वाच्या घोषणा

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) अंतर्गत कुटुंब निवृत्तीवेतन:

  • कुटुंबास सन्मानाचे जीवन जगण्यासाठी आणि चांगले जीवनमान कायम ठेवण्यासाठी, रोजगाराशी संबंधित मृत्यू प्रकरणांसाठी असलेला ईएसआयसी निवृत्तीवेतन योजनेचा लाभ कोविडमुळे मरण पावलेल्यांनाही देण्यात येत आहे.
  • अशा व्यक्तींवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्य विद्यमान नियमांनुसार कर्मचाऱ्यांच्या सरासरी दैनंदिन वेतनाच्या 90% इतका निवृत्तीवेतनाचा लाभ मिळण्यास पात्र असतील.
  • हा लाभ २४-३-२०२० पासून आणि अशा सर्व प्रकरणांसाठी २४-३-२०२२ पर्यंत पूर्वलक्षी प्रभावाने लागू असेल.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना- कर्मचार्‍यांची ‘ठेवी संलग्न विमा योजना’ (ईडीएलआय):

  • ईडीएलआय योजनेतील विमा लाभात वाढ करून त्याची व्याप्ती ही वाढवली आहे. इतर सर्व लाभार्थ्यांव्यतिरिक्त, हे विशेषत: कोविडमुळे आपला जीव गमावलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटूंबास मदत करेल.
  • विम्याचा कमाल लाभ 6 लाख रुपयांवरून 7 लाख रुपये करण्यात आला आहे.
  • २.५ लाख रुपयांच्या किमान विमा लाभाची तरतूद पुनर्संचयित केली गेली आहे आणि १५ फेब्रुवारी २०२० पासून पुढील तीन वर्षांसाठी पूर्वलक्षी प्रभावाने लागू असेल.
  • कंत्राटी / हंगामी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यासाठी केवळ एका आस्थापनेमध्ये कायम नोकरीची अट शिथिल केली गेली आहे, ज्याद्वारे मृत्यूपूर्वी १२ महिन्यांत नोकरी बदललेल्या अशा कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यात आला आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,090सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा