30 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरराजकारणकाँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या, दहशतवाद्यांच्या बाजूने उभा राहिला

काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या, दहशतवाद्यांच्या बाजूने उभा राहिला

Google News Follow

Related

रविवारी आसामच्या दररंग जिल्ह्यातील सार्वजनिक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तीव्र हल्ला चढवला. त्यांनी आरोप केला की काँग्रेस पक्ष नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या आणि पाकिस्तानकडून तयार केलेल्या दहशतवाद्यांच्या बाजूने उभा राहिला आहे.

मोदी म्हणाले, “आपल्या शूर जवानांसोबत उभं राहण्याऐवजी काँग्रेसने घुसखोर आणि भारताच्या ऐक्याला धोका देणाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. या पक्षाने वारंवार भारतविरोधी शक्तींना आडोसा दिला आहे. मात्र भाजप कधीच घुसखोरांना जमीन बळकवू देणार नाही किंवा राज्याचं लोकसंख्याशास्त्र बदलू देणार नाही.”

काँग्रेसवर शेतजमीन आणि धार्मिक स्थळांवरील अतिक्रमणाचा आरोप

पंतप्रधान म्हणाले की काँग्रेसच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांच्या जमिनींवर आणि धार्मिक स्थळांवर अतिक्रमण करण्यात आले.
“भाजप-एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर या चुकींची दुरुस्ती सुरू झाली आहे आणि बेकायदेशीर दावे हटवले जात आहेत,” असे मोदींनी सांगितले.

त्यांनी दावा केला की आसाममध्ये लाखो एकर जमीन घुसखोरांकडून परत मिळवली गेली आहे.

“भाजपचं ध्येय म्हणजे देशाला घुसखोरांपासून वाचवणं आणि त्याची अखंडता पुनर्स्थापित करणं. जे राजकारणी घुसखोरांचे रक्षण करतात त्यांना जनता कधीच माफ करणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर आरोप

मोदींनी पुढे आरोप केला की काँग्रेसचं राजकारण नेहमी भारतविरोधी विचारांच्या लोकांसोबत असतं.
ते म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर दरम्यानही आपण पाहिलं की जेव्हा भारतीय सेना पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत होती, तेव्हा काँग्रेसने पाकिस्तानच्या सैन्याची बाजू घेतली. आपल्या जवानांऐवजी काँग्रेस दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांचा अजेंडा पुढे रेटते.”

हे ही वाचा:

आता देशात एक डेमोग्राफी मिशन

मी भगवान शंकराचा भक्त, सगळं विष पचवतो…

पुण्यात दर्ग्याच्या खाली सापडले भुयार

पलामूत सुरक्षादलाकडून ५ लाखांचा इनामी नक्षलवादी ठार

भूपेन हजारिका यांचा उल्लेख – काँग्रेसवर अपमानाचा आरोप

मोदींनी आसामच्या सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करताना भारतरत्न पुरस्कार विजेते भूपेन हजारिका यांचा संदर्भ दिला.
ते म्हणाले, “जेव्हा सरकारने भूपेन दांना भारतरत्न दिलं, तेव्हा काँग्रेसच्या नेत्याने अपमानास्पद विधान केलं की मोदी भारतरत्न नर्तक-गायकांना देतात. ईशान्य भारताच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत.” मोदी म्हणाले की, कला व संगीतप्रेमींनी काँग्रेसला विचारलं पाहिजे की त्यांनी भूपेन दांचा अपमान का केला.

काँग्रेसचा विकासावर दुर्लक्ष, भाजपची कामगिरी अधोरेखित

पंतप्रधानांनी दावा केला की काँग्रेसच्या दीर्घ कारकिर्दीत ब्रह्मपुत्रेवर केवळ तीन पूल बांधले गेले, तर भाजपने गेल्या १० वर्षांत सहा पूल उभारले. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी घुसखोरांचे अतिक्रमण हटवून शेतकऱ्यांसाठी जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल मोदींनी त्यांचे कौतुक केले. त्यांनी ५७० कोटी रुपयांच्या आरोग्य प्रकल्पांची पायाभरणी केली. त्यात दररंग मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, नर्सिंग कॉलेज, जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी (GNM) स्कूल यांचा समावेश आहे.

मोदी म्हणाले की, या सुविधा आरोग्य क्षेत्रातील शिक्षण व रोजगारासाठी नवे मार्ग खुलं करतील. मोदींनी नागरिकांना आवाहन केले की मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वदेशी वस्तू खरेदी करा. ते म्हणाले, “नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून जीएसटीमध्ये मोठे बदल होणार आहेत. दर कमी होतील, ज्यामुळे घरगुती वस्तू स्वस्त होतील आणि प्रत्येक कुटुंबाला फायदा होईल.”

आसामच्या प्रगतीचं कौतुक – विकसत भारताकडे वाटचाल

मोदींनी आसामला “ओळखीचं आणि शौर्याचं केंद्र” म्हटलं आणि सांगितलं की राज्याने १३% आर्थिक वाढ साधली आहे. “भारत जगातलं सर्वात जलद प्रगती करणारा देश आहे आणि आसाम त्यातला एक वेगाने वाढणारा राज्य आहे. हेच ‘विकसित भारत’ या संकल्पनेचं मूळ आहे,” असं त्यांनी सांगितलं.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा