27 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरराजकारणशरद पवारांनी ६० वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केलं?

शरद पवारांनी ६० वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केलं?

नरेंद्र मोदींचा शरद पवारांना खोचक सवाल

Google News Follow

Related

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये आले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला. शरद पवारांनी ६० वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा खोचक सवाल नरेंद्र मोदींनी उपस्थित केला.

योजनांसाठी किती निधीची तरतूद केली हे सांगत असताना त्यांनी यापूर्वीच्या सरकारच्या काळात किती भ्रष्टाचार झाला यावर भाष्य केले. पंतप्रधान मोदी यांनी म्हणाले की, “आमचे सरकार ‘सबका साथ सबका विकास’च्या मंत्रावर चालते. गरिबांचे कल्याण करण्यासाठी सरकार काम करत आहे. आतापर्यंत १ कोटी १० लाख नागरिकांनी आयुष्यमान कार्ड अंतर्गत मोफत उपचाराचा लाभ घेतला आहे. गरिबांना मोफत रेशन आणि घर देण्यासाठी ४ लाख कोटी रुपयांचा खर्च केला आहे. मी लाखो कोट्यवधी रुपयांचे आकडे सांगत आहे. हेच आकडे आपण ऐकले असतील पण ते भ्रष्टाचाराचे होते. आधीच्या सरकारने एवढ्या रक्कमांचे घोटाळे केले. त्यांनी फक्त घोटाळे केले आहे. पण आम्ही विकास करतोय,” असा सणसणीत टोला नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून लगावला.

महाराष्ट्राच्या वरिष्ठ नेत्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने फक्त राजकारण केले आहे. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता, केंद्रामध्ये कृषी मंत्री राहिलेला नेता. व्यक्तिगत मी त्यांचा आदर करतो, पण त्यांनी गेल्या ६० वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी काय केलं आहे? असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला आहे. ६० वर्षांच्या कार्यकाळात देशभरातील शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी रुपयांच्या एमएसपीवर अन्नधान्य खरेदी केले. दुसरीकडे आमच्या सरकारने सात वर्षांच्या काळात साडेतेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. २०१४ च्या पूर्वी शेतकऱ्यांच्या मालाची ५०० ते ६०० कोटी रुपयांची एमएसपीवर खरेदी व्हायची, आमच्या सरकारने १ लाख १५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

अमेरिकेत बंदुकधाऱ्याच्या अंदाधुंद गोळीबारात २२ ठार

शहीद अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबियांना शिंदे सरकारकडून मदत जाहीर

जितेंद्र आव्हाडांचे ड्रग्स तस्करांशी संबंध?

NCERT च्या नव्या पुस्तकांमध्ये ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’

२०१४ पूर्वी शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी दलालांवर अवलंबून राहावे लागत होते. अनेक महिने पैशांसाठी वाट पाहावी लागत होती. परंतु, आमच्या सरकारने ही दलालशाही मोडीत काढली. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम पाठवली जात आहे. सरळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे मिळत असल्यामुळे दलालीशाही संपली आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी भाषणावेळी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा