32 C
Mumbai
Wednesday, May 18, 2022
घरक्राईमनामानवाब मलिकांना २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

नवाब मलिकांना २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

Related

मनी लाँड्रिंगप्रकरणी सध्या तुरुंगात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे. २२ एप्रिल पर्यंत नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे. दरम्यान नवाब मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

नवाब मलिक हे गेल्या अनेक दिवसांपासून मनी लाँड्रिंगप्रकरणी तुरुंगात आहेत. बुधवार, १३ एप्रिल रोजी ईडीने मोठी कारवाई करत नवाब मलिकांची मालमत्ता जप्त केली होती. या कारवाईत नवाब मलिक यांच्या एकूण आठ मालमत्तांवर इडीने टाच आणली होती. कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंडसह आठ मालमत्ता नबाव मलिकांच्या ईडीने जप्त केल्या आहेत.

हे ही वाचा:

शेअर बाजार घसरला, तर सोनं-चांदी तेजीत

मुंबईच्या आरे कॉलनीत कळस यात्रेत हिंसाचार

अमरावतीत हिंसाचार; कलम १४४ लागू 

महिला शिवसैनिकांनी शिवसेना शहर प्रमुखाला झोडपले

कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना ईडीने अटक केले असून मालमत्ता खरेदी आणि गैरव्यवहार प्रकरणात मलिकांचा संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. कुर्ल्यातील मोक्याची जमीन कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर एका पत्रकार परिषदेत केला होता. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांकडून मलिक यांच्याशी संबंधित कंपनीने ही जागा विकत घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्या संदर्भात पुरावेही दिले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,975चाहतेआवड दर्शवा
1,883अनुयायीअनुकरण करा
9,330सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा