32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरराजकारणनितीश कुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, भाजपसोबत युती!

नितीश कुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, भाजपसोबत युती!

इंडी आघाडीत परिस्थिती चांगली न्हवती,राज्यातील कामेही अपुरी, म्हणून बाहेर पडण्याचा निर्णय , नितीश कुमार

Google News Follow

Related

बिहारमध्ये सुरु असलेल्या दोन तीन दिवसांच्या राजकीय नाट्याचा अखेर शेवट झाला आहे.जनता दलचे (संयुक्त) प्रमुख नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.नितीश कुमार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे.नीतीश कुमार पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील झाले असून भारतीय जनता पार्टीबरोबर राज्यात सरकार स्थापन करणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

राजभवनातून राजीनामा देऊन बाहेर पडलेल्या नितीश कुमार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले की, मी थोड्याच वेळापूर्वी माझ्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.राज्यातलं विद्यमान सरकार विसर्जित करावे, असे राज्यपालांना सांगितले आहे.इंडी आघाडीमध्ये परिस्थिती चांगली न्हवती.बरीच कामे राज्यात होत नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच आता आम्ही इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार आहोत, असे नितीश कुमार यांनी सांगितले.

हे ही वाचा:

मराठा आरक्षणाच्या मोर्चात चोरट्यांनी लंपास केला पावणे चार लाखांचा ऐवज

उत्तराखंडमधील मदरशांमध्ये रामायण शिकवणार

मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा..!

काँग्रेस म्हणजे निवडणुका जवळ आल्या की, मत मागणारा पक्ष

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपला राजीनामा राज्यपालांना दिला आहे.याअगोदर बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयूचं सरकार होतं.आता महाआघाडीच्या सरकारमधून बाहेर पडत नितीश कुमार हे भाजपसोबत सरकार स्थापन करणार आहेत.नितीश कुमार आता ९ व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.तसेच नितीश कुमार यांच्यासह भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.यामध्ये सुशील मोदी आणि रेणू देवी यांची नावे
पुढे आली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा