26 C
Mumbai
Tuesday, July 16, 2024
घरक्राईमनामादिल्ली: जागरण कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळला, एकाचा मृत्यू तर १७ जखमी!

दिल्ली: जागरण कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळला, एकाचा मृत्यू तर १७ जखमी!

गायक बी प्राकची गाणी सुरु असताना घडली घटना

Google News Follow

Related

दिल्लीतील कालकाजी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली.कार्यक्रमादरम्यान अचानक स्टेज कोसळला.या दुर्घटनेत एक महिलेचा मृत्यू तर १७ जण जखमी झाले आहेत.शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली.या जागरण सोहळ्याला प्रसिद्ध गायक बी प्राक मंचावर उपस्थित होते.मिळालेल्या माहितीनुसार, गायक बी प्राक यांच्या जवळ जाण्याचा जमावाने प्रयत्न केल्याने स्टेजवर अतिरिक्त भार झाल्याने स्टेज खाली कोसळला.

मिळालेल्या माहितीनुसार, कालकाजी मंदिरात गेल्या २६ वर्षांपासून माता जागरणाचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने २६ जानेवारीला एका कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायक बी प्राकही आले होते. त्यामुळे कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोजकांनी या कार्यक्रमासाठी औपचारिक परवानगी घेतली नव्हती. मात्र, याची माहिती मिळताच पोलिसांनी सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

हे ही वाचा:

प्रभादेवीच्या प्रभावती मातेच्या जत्रेला सुरुवात

जामनेरमध्ये ’नमो कुस्ती महाकुंभ’; देणार व्यसनमुक्तीचा मंत्र

‘इतिहासात काय नाव लिहून जाणार, नितीश कुमार?’

परदेशी म्हटल्याबद्दल अधीर रंजन यांच्याकडून तृणमूलच्या डेरेक ओब्रायन यांची माफी

दक्षिणपूर्व दिल्लीचे डीसीपी राजेश देव यांनी सांगितले की, मंदिरात जागरणाचा कार्यक्रम सुरु होता.रात्री १२.३० च्या सुमारास लोकांची संख्या वाढली आणि ही संख्या १५००-१६०० पर्यंत गेली.गायक बी प्राक कार्यक्रमात परफॉर्म करत असताना अती उत्साही झाल्यानंतर अनेक लोक स्टेजवर चढले.स्टेजवर अतिरिक्त भर झाल्याने ते एका बाजूला झुकले आणि परिणामी ते कोसळले.आयोजकांच्या म्हणण्यानुसार, व्हीआयपींच्या कुटुंबांना बसण्यासाठी मुख्य मंचाजवळ एक उंच व्यासपीठ बांधण्यात आले होते. हा प्लॅटफॉर्म लाकूड आणि लोखंडी फ्रेमचा बनवला होता. क्षमतेपेक्षा जास्त लोक या फलाटावर चढले असल्याने हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.या घटनेनंतर प्लॅटफॉर्म खाली बसलेले अन्य लोक जखमी झाले.

पोलिसांनी सांगितले की, या दुर्घटनेत १७ जण गंभीर झाले असून एका ४५ वर्षीय महिलेचा मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले परंतु तिला मृत घोषित करण्यात आले.या महिलेची ओळख पेटवण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.सर्व जखमींना रुग्णवाहिकेद्वारे एम्स ट्रॉमा सेंटर आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत कलम ३३७,३०४A, १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा