34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणवादळग्रस्त आदिवासी कुटुंबियांच्या तोंडाला सरकारने पुसली पाने

वादळग्रस्त आदिवासी कुटुंबियांच्या तोंडाला सरकारने पुसली पाने

Google News Follow

Related

तौक्ते चक्रीवादळाने संसाराची धूळधाण उडालेल्या आदिवासी कुटुंबांना वेळेवर पंचनामा होऊनही अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. मंत्र्यांचे बंगले गाड्यांवर उधळपट्टी करणारे खंडणी सरकार गोरगरीबांच्या संसाराची होळी झाली तरी डोळ्यावर कातडे पांघरुन बसले आहे, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारच्या असंवेदनशीलतेवर टीका केली आहे.

तौक्ते वादळ उलटून आता दोन महिने उलटायला आले. तरीही सरकारने दिलेली आश्वासने जैसे थे आहेत. मे महिन्यातील तौक्ते वादळाने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. त्यानंतर नुकसानीचा पंचनामा झाला, पण अजूनही आदिवासी बांधवांच्या पदरी केवळ निराशाच आहे.

हे ही वाचा:
गणेशमूर्ती साकारणारे हात पुन्हा आर्थिक विवंचनेत

रुग्णालये म्हणजे पैसे छापण्याचा उद्योग!; सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

राष्ट्रवादी, माकपचा न्यायालयात माफीनामा

पालिकेत हा कुठल्या ‘पेंग्विन गँग’चा भ्रष्टाचार सुरू आहे?

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील आदिवासी पाड्यांमधील घरांचे खूप नुकसान झाले. त्यानंतर पंचनामाही त्वरित केला. परंतु अजूनही आदिवासी बांधव निधीच्या प्रतीक्षेत आहेत. लोकसत्ता या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार पंचनामे होऊनही अजून मदत नाही. तोक्ते चक्रीवादळाने संसाराची धूळधाण उडालेल्या आदिवासी कुटुंबांना वेळेवर पंचनामा होऊनही अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. बोरिवली तालुक्यात २५८ घरांचे अंशत:, तर ५३ घरांचे पूर्ण नुकसान झाले. यात आरेतील १९, राष्ट्रीय उद्यानातील ३८ घरांचा समावेश आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईच्या किनारी भागातील अनेकांच्या घरांचे छप्पर उडून गेले. तसेच घरांवर वृक्षही उन्मळून पडले. त्यामुळे आदिवासी पाड्यांचे खूपच नुकसान झाले. तहसीलदार कार्यालयाकडून त्वरित पंचनामा करण्यात आला, पण मदत मात्र नाहीच. राज्य शासनाच्या ‘एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया’कडून भरपाईची रक्कम प्राप्त झालेली नाही. त्यामुळे काही आदिवासींनी खिशातले पैसे खर्च करून घर बांधून घेतले. तर काहींनी तात्पुरती व्यवस्था करुन गुजराणीला सुरुवात केली.

गोराई गावातील ओडिलिया किणकर यांचे घर अर्धे पडले. त्यामुळेच सध्याच्या घडीला पडलेला भाग झावळ्या आणि कापडाने झाकून ठेवला आहे. उत्पन्नाचा दाखला ऑनलाइन मिळवणे आदिवासींना जमत नसल्याने तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर बसलेल्यांना १ हजार रुपये देऊन दाखले काढावे लागले आहेत. आरेतील वनीच्या पाड्यावरील रवींद्र गमरे यांच्या घरावर भलेमोठे आगिस्ताचे झाड पडले. नुकसानभरपाई न मिळाल्याने त्यांनी ७ लाख रुपये कर्ज काढून घर बांधून घेतले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा