26 C
Mumbai
Tuesday, July 16, 2024
घरक्राईमनामापंतप्रधान मोदींविषयी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे केजरीवाल, प्रियांका गांधींना नोटीस

पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे केजरीवाल, प्रियांका गांधींना नोटीस

निवडणूक आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस

Google News Follow

Related

काँग्रेसच्या सरचिटणीस आणि नेत्या प्रियांका गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने या दोन्ही नेत्यांना नोटीस पाठवली आहे. या दोन्ही नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

सोशल मीडियावर आम आदमी पक्षातर्फे म्हणजेच आपतर्फे एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओच्या विरोधात भाजपाने तक्रार केली होती. त्यानंतर  निवडणूक आयोगाने आप या पक्षालाही नोटीस बजावली आहे. १६ नोव्हेंबरच्या दिवशी संध्याकाळपर्यंत उत्तर द्यावं असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.

भाजपा नेत्यांनी प्रियांका गांधींविरोधात तक्रार केली होती. त्यात असं म्हटलं होतं की, प्रियांका गांधींनी मध्य प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी काही वक्तव्ये केली होती. त्याला सत्याचा कुठलाही आधार नव्हता ती वक्तव्ये खोटी होती. खासगीकरणावरुन त्यांनी हे आरोप केले होते. त्यावरुन प्रियंका गांधींना कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे.

हे ही वाचा:

५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरले

सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात

टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार!

कुत्र्याने बंगळुरूला परतून लावले विस्तारा विमान!

आम आदमी पक्षाने नरेंद्र मोदींना टार्गेट करत चुकीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. तसंच त्यावर काही प्रतिक्रियाही दिल्या होत्या. ज्यानंतर भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी अनिल बलुनी आणि नेते ओम पाठवक यांच्यासह भाजपाच्या एका प्रतिनिधी मंडळाने निवडणूक आयोगाकडे प्रियांका गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दिला. या दोघांनीही केलेला उल्लेख चुकीचा आहे, निराधार आहे असं अर्जात नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने प्रियांका गांधी आणि अरविंद केजरीवाल या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा