26 C
Mumbai
Wednesday, July 17, 2024
घरक्राईमनामाटिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार!

टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार!

पोलिसांकडून आरोपीला अटक

Google News Follow

Related

टिटवाळा रेल्वे परिसरात एका महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पीडित महिला रेल्वे रुळावरून जात असताना तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर अली आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपी विशाल चव्हाण याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी शहाड येथील एका खासगी कंपनीत काम करते. सोमवारी रात्री कंपनीतून बाहेर पडल्यानंतर पीडित महिला लोकल ट्रेनने टिटवाळा स्टेशनवर पोहोचली. तिचे घर स्टेशनपासून जवळच असल्याने ती पती सोबत मोबाईलवर बोलत घराच्या दिशेने रेल्वे रुळावरून चालली होती.त्यावेळी आरोपीने महिलेचा पाठलाग केला.संधी मिळताच आरोपीने महिलेला बळजबरीने रेल्वे ट्रॅकजवळील झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. महिलेने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने गुन्हा करून पसार झाला.

हे ही वाचा:

कुत्र्याने बंगळुरूला परतून लावले विस्तारा विमान!

मायकल जॅक्सनच्या ४० वर्षापूर्वीच्या जॅकेटची किंमत २.५ कोटी!

केरळातील पाच वर्षांच्या मुलीवरील बलात्कार, हत्येप्रकरणी आरोपी अश्फाकला फाशी

कर्नाटकात परिक्षागृहात हिजाब घालण्यास मनाई!

त्यानंतर पीडितेने घरी आल्यावर घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीस सांगितला.पती आणि पत्नी दोघे मिळून पोलीस ठाणे गाठत संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना सांगत तक्रार दाखल केली.टिटवाळा स्थानिक पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.त्यानंतर काही तासातच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.मात्र, हा सगळा प्रकार रेल्वेच्या हद्दीत घडल्याने पोलिसांनी हा गुन्हा रेल्वे पोलिसांकडे वर्ग करत आरोपीला देखील रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल चव्हाण हा पडघा येथील एका खासगी कंपनीत काम करतो. या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त मनोज पाटील आणि कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा