30 C
Mumbai
Wednesday, July 17, 2024
घरविशेषमायकल जॅक्सनच्या ४० वर्षापूर्वीच्या जॅकेटची किंमत २.५ कोटी!

मायकल जॅक्सनच्या ४० वर्षापूर्वीच्या जॅकेटची किंमत २.५ कोटी!

१९८४ मध्ये मायकल जॅक्सनने पेप्सीच्या अॅडसाठी वापरले होते जॅकेट

Google News Follow

Related

मायकल जॅक्सनने १९८४ साली पेप्सी या कोल्ड्रिंक्सच्या जाहिरातीत वापरण्यात आलेल्या जॅकेटची तब्बल २.५ कोटी रुपयांना विक्री झाली आहे.मायकेल जॅक्सनने परिधान केलेल्या काळ्या-पांढऱ्या लेदर जॅकेटचा लिलाव नुकताच लंडनमध्ये झाला.लंडनमधील लिलावात जॅक्सनच्या जॅकेटची $३०६,००० (रु. २.५ कोटी) रुपयात विक्री झाली आहे.विशेष म्हणजे पॉप स्टार मायकल जॅक्सनने हे लेदर जॅकेट १९८४ साली पेप्सीच्या जाहिरातीमध्ये वापरले असून याला ४० वर्ष ओलांडून गेले आहेत.

प्रॉपस्टोर यांच्याकडून लंडनमध्ये हा लिलावाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रॉपस्टोर यांच्याकडून सांगण्यात आले की, मायकेल जॅक्सनच्या जॅकेटसह, एमी वाईनहाऊस हेअरपीस, जॉर्ज मायकेलचे जॅकेट, डेव्हिड बोवी आणि एल्विस यांसारख्या दिग्गजांच्या संगीत संबंधित अशा एकूण २०० पेक्षा जास्त वस्तू लिलावात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अंगस यंगचा एक गिब्सन गिटार देखील होता जो विकला गेला नसल्याचे प्रॉपस्टोर यांच्याकडून सांगण्यात आले.

हे ही वाचा:

गर्दीमुळे डब्यात चढूच शकला नाही; रेल्वेकडे मागितले एसी तिकिटाचे संपूर्ण पैसे!

केरळातील पाच वर्षांच्या मुलीवरील बलात्कार, हत्येप्रकरणी आरोपी अश्फाकला फाशी

कर्नाटकात परिक्षागृहात हिजाब घालण्यास मनाई!

विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या उपांत्य फेरीचा इतिहास काय सांगतो?

दरम्यान, जेव्हा जॅक्सनने १९८४ साली जाहिरात करताना जॅकेट घातले होते तेव्हा एका घटनेमुळे ते बदनाम झाले होते, ज्यावेळी चित्रीकरण चालू होते तेव्हा जॅक्सनच्या केसांना आग लागली होती आणि त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता.मात्र, लिलाव करण्यात आलेले हे जॅकेट त्यावेळी त्याने घातले नव्हते. मायकेलने नंतर सांगितले होते की, शरीराच्या दुखापतींमुळे मला वेदनाशामक औषधे घ्यावे लागत होते, त्यामुळेच मला निर्धारित औषधांचे व्यसन लागले.
‘दिस इज इट’ या कार्यक्रमाची तयारी करत असताना २५ जून २००९ रोजी मायकेल जॅक्सनचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.प्रोपोफोल आणि बेंझोडायझेपाइनच्या नशेमुळेच जॅक्सनला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा