27 C
Mumbai
Saturday, September 14, 2024
घरविशेषविश्वचषक स्पर्धेतील भारताच्या उपांत्य फेरीचा इतिहास काय सांगतो?

विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या उपांत्य फेरीचा इतिहास काय सांगतो?

भारताचा संघ सातपैकी केवळ तीनच उपांत्य सामने जिंकू शकला

Google News Follow

Related

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीचा सन १९८३पासून आढावा घेतल्यास यात सातत्याने चढउतार झाल्याचे दिसते. भारतीय संघ सन २०२३ विश्वचषक स्पर्धेत एकही सामना हरलेला नाही. आता भारताचा सामना न्यूझीलंडशी ऐतिहासिक वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. याच मैदानावर एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने १२ वर्षांपूर्वी विश्वचषक उंचावला होता. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा संघ न्यूझीलंडने सन २०१९मध्ये केलेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा १९८३पासूनचा आढावा घेल्यास भारताचा संघ सातपैकी केवळ तीनच उपांत्य सामने जिंकू शकला आहे. सन १९८३, २००३ आणि २०११मध्ये तीन उपांत्य सामने भारताने जिंकले होते.

१९८३ : पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव

सन १९८३मध्ये कपिल देव याच्या कर्णधारपदाखाली भारताच्या संघाने उपांत्य सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. ही लढत इंग्लंडमध्ये झाली होती. कपिल देवने तीन विकेट घेतल्या होत्या, तर यशपाल शर्माने ६१ धावांची खेळी केली होती. तर, अंतिम सामन्यात भारताने गतविजेत्या वेस्ट इंडिजला पराभूत करून विश्वचषकावर नाव कोरले होते.

१९८७-१९९९ संमिश्र कामगिरी

१९८७मध्ये भारताचा संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. मात्र इंग्लंडने वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या सामन्यात भारताला ३५ धावांनी पराभूत केले. सन १९९२मध्येही तीच गत झाली. तर, १९९६मध्ये भारताचे विश्वचषकाचे स्वप्न श्रीलंकेने धुळीस मिळवले. त्यावेळी कोलकात्यात रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने भारताला पराभूत केले. २५२ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ आठ विकेट गमावून केवळ १२० धावाच करू शकला. मात्र प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे पंचांना सामना थांबवावा लागला. १९९९मध्ये भारत हा सुपर सिक्स गटापर्यंत पोहोचण्यातही अपयशी ठरला. त्यामुळे संघाला तणावाच्या परिस्थितीत सातत्य ठेवता येत नाही का, असे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

२००३ : थोडक्यात संधी हुकली

दक्षिण आफ्रिकेत रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेत सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उपांत्य सामन्यात केनयाला पराभूत केले आणि अंतिम फेरीत धडक दिली. मात्र रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले आणि तिसऱ्यांदा जगज्जेतेपदावर नाव कोरले.

२००७ : गटसाखळीतच गाशा गुंडाळण्याची वेळ

वेस्ट इंडिजमध्ये रंगलेली सन २००७ची विश्वचषक स्पर्धा अतिशय मानहानीकारक ठरली. राहुल द्रविड याच्या कर्णधारपदाखालील भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. मात्र संघाला गटसाखळीतच गाशा गुंडाळावा लागला.

२०११ : धोनीने केली करामत

मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. भारातने २६० धावांचे लक्ष्य समोर ठेवले होते. गौतम गंभीरने ९७ धावा केल्या तर, धोनीने १० चेंडूंत २५ धावा केल्या होत्या. यात भारतीय संघाने २९ धावांनी विजय मिळवला. अंतिम सामन्यात भारताचा सामना श्रीलंकेशी झाला. येथे श्रीलंकेने दिलेले लक्ष्य गाठून भारताने विश्वचषक उंचावला.

हे ही वाचा:

अवकाशातील प्रकाशउत्सव… नासाकडून दिवाळी शुभेच्छा!

रात्री १० नंतर फटाके फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल, ८०६ जणांवर कारवाई

‘भारतात काय बदलले? उत्तर नरेंद्र मोदी आहेत’

गर्दीमुळे डब्यात चढूच शकला नाही; रेल्वेकडे मागितले एसी तिकिटाचे संपूर्ण पैसे!

२०१५ : सिडनीमध्ये धक्का

सिडनीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान उपांत्य फेरीचा सामना रंगला. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करून ३२८ धावांचे लक्ष्य भारतासमोर ठेवले. मात्र मिशेल जॉन्सनसारख्या गोलदाजांनी भारतीय फलंदाजांना नामोहरम केले. विराट कोहलीने शतक ठोकले, मात्र भारत विजयाच्या समीप पोहोचू शकला नाही आणि ऑस्ट्रेलियाचा संघ ९५ धावांनी विजयी झाला.

२०१९मध्येही स्वप्नभंग

सन २०१९च्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजीला येऊन आठ विकेट गमावून २३९ धावांचे लक्ष्य समोर ठेवले होते. मात्र भारत हे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. आता याच पराभवाचे उट्टे फेडण्याची संधी भारताला चालून आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा