27 C
Mumbai
Thursday, August 18, 2022
घरराजकारणउमेदवाराच्या कुटुंबात बारा सदस्य; पण त्याला मत मात्र एकच!

उमेदवाराच्या कुटुंबात बारा सदस्य; पण त्याला मत मात्र एकच!

Related

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गुजरातच्या वापी जिल्ह्यातील एका उमेदवाराला केवळ एक मत मिळाल्याने त्याला धक्का बसला. तेही त्याचेच मत होते. उमेदवारासाठी लाजिरवाणी गोष्ट म्हणजे त्याच्या कुटुंबात एकूण बारा सदस्य होते, त्यापैकी कोणीही त्याला मतदान केले नाही, असे इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

वापी जिल्ह्यातील छरवाला गावात सरपंच पदासाठी संतोष या उमेदवाराने अर्ज दाखल केला होता. एकूण बारा मतदार असलेले त्यांचे कुटुंबीय त्यालाच मतदान करतील,अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, मतमोजणीनंतर संतोषला एकच मत मिळाले, तेही आपलेच. मतमोजणी केंद्राजवळ त्याचे अश्रू अनावर झाले होते. त्याच्याच कुटुंबातील मतदारांनी त्याला मत नाही दिले याचा त्याला धक्का बसला. दुःख अनावर झालेल्या संतोषने मतमोजणी केंद्रात ही बाब मोठ्याने ओरडून सांगितली.

ही बातमी सोशल मीडियावर खूपच पसरली आणि नेटिझन्सकडून खूप प्रतिक्रिया आल्या आहेत. ही निवडणूक दोन दिवसांपूर्वी पार पडली होती. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी रात्री गुजरातमधील ८ हजार ६८६ ग्रामपंचायतींपैकी ६ हजार ४८१ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर केले.

हे ही वाचा:

नवा स्मार्टफोन घेतला आणि ढोल वाजले!

अहमदनगरला भाजपाचा झेंडा; महाविकास आघाडीला ठेंगा

१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत

‘ठाकरे सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय झालेली नाही’

 

ग्रामपंचायतीची निवडणूक उमेदवार पक्षाच्या चिन्हावर नसून त्याच्या वैयक्तिक क्षमतेवर लढवतो. मात्र, उमेदवारला कोणत्या ना कोणत्या पक्षाशी संलग्न राहावे लागते. सकाळी ९ वाजल्यापासून ३४४ केंद्रांवर मतमोजणी सुरू होती. बॅलेट पेपरद्वारे मतदान झाले होते. २ हजार २०५ जागांसाठी मतमोजणी अद्याप पूर्ण व्हायची आहे, असे राज्य निवडणूक मंडळाने सांगितले. निकाल येताच, भरूच जिल्ह्यातील हिंगलोट गावात विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,912चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा