29 C
Mumbai
Friday, August 19, 2022
घरराजकारण‘मुख्यमंत्री अधिवेशनाला आले काय आणि नाही आले काय राज्याला फरक पडत नाही’

‘मुख्यमंत्री अधिवेशनाला आले काय आणि नाही आले काय राज्याला फरक पडत नाही’

Related

हिवाळी अधिवेशनाला बुधवारी २२ डिसेंबरला सुरुवात झाली. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या प्रकृतीसंबंधी कारणामुळे अधिवेशनाला आले नाही. यावरून विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली. त्यावरूनच आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ते अधिवेशनात उपस्थित नाहीत यात नवीन काय घडत आहे, अशी खोचक टीका दानवे यांनी केली आहे.

रावसाहेब दानवे हे संघ मुख्यालयाला भेट देण्यासाठी बुधवारी नागपुरात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. आम्ही देवाला प्रार्थना करतो की, मुख्यमंत्री लवकरात लवकर बरे व्हावेत आणि जनतेच्या सेवेत रुजू व्हावे, असेही दानवे म्हणाले.

हे ही वाचा:

नवा स्मार्टफोन घेतला आणि ढोल वाजले!

उद्या कोणी वाकडे तोंड करून बोलले तर?…चालेल का?

१७० बहुमत असतानाही महाविकास आघाडीच्या मानगुटीवर भीतीचे भूत

इम्पेरिकल डेटासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून मंत्रालयात किती वेळा आले? राज्यात त्यांनी किती दौरे केले? राज्यावर संकट असताना ते कधी बाहेर पडले? त्यामुळे मुख्यमंत्री आले काय किंवा नाही आले काय राज्याला काही फरक पडणार नाही, असा टोला रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

आठ वर्षांत केंद्र सरकारने रेल्वे, कृषी, उद्योग क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात चांगले काम केले आहे. परंतु, राज्य सरकार काहीच काम करू शकले नाही, असा आरोपही दानवे यांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,910चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा