31 C
Mumbai
Friday, May 24, 2024
घरराजकारण“नरेंद्र मोदींमुळेचं पाकिस्तान शांत बसलाय”

“नरेंद्र मोदींमुळेचं पाकिस्तान शांत बसलाय”

भाजपा उमेदवार नवनीत राणा यांचे नरेंद्र मोदींसाठी गौरवोद्गार

Google News Follow

Related

अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपाने नवनीत राणा यांना उमेदवारी देऊ केली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या कामाला वेग आला असून नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे अमरावतीमध्ये सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले आहेत.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील पहिल्या क्रमांकाचे नेते आहेत. रशिया युद्धावेळी ज्याप्रकारे आमची मुलं झेंडे घेऊन बाहेर पडली तेव्हा पंतप्रधान मोदी यांची ताकद कळाली. आज पाकिस्तान जो शांत बसला आहे, त्यामागेही नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधान मोदी विश्वभरात काम करत आहेत, ते शेवटच्या नव्हे तर पहिल्या रांगेत आहेत,” असे वक्तव्य भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केले आहे. देशात मोदींची हवा आहे. त्यामुळे आमच्यासमोर कोणतंही आव्हान नाही. देशात मोदींची हवा होती, आहे आणि कायम राहील, असे राणा यांनी म्हटले.

हे ही वाचा:

मुंबईत सूर्य आग ओकणार; आठवड्याअंती उकाडा वाढणार

‘हा तर देश तोडण्याचा कट’

क्रूर पाकिस्तानी दहशतवादी अबू हमजाविरोधात लूकआऊट नोटीस

कोरियामध्ये मशीद बांधण्याच्या माजी के-पॉप स्टार दाऊद किमच्या प्रस्तावाला स्थानिकांचा विरोध

यावेळी नवनीत राणा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकेची तोफ डागली. “काहीजण राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्यासोबत पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगत आहेत. पण केवळ दिवसा स्वप्न पाहणाऱ्यांना राहुल गांधी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे वाटत आहे. पण उघड्या डोळ्यांना पाहिलेली स्वप्न कधीच पूर्ण होत नसतात, ही गोष्ट काँग्रेसने लक्षात घेतली पाहिजे. पंतप्रधान मोदींची आज जगभरातील कामगिरी पाहता त्यांच्या नेतृत्त्वाशी राहुल गांधी यांची तुलना होऊच शकत नाही,” अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा