32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरदेश दुनियापाकिस्तान भित्र्यांचा आणि वाटमाऱ्यांचा देश!

पाकिस्तान भित्र्यांचा आणि वाटमाऱ्यांचा देश!

Google News Follow

Related

इम्रान खान यांच्यावर त्यांच्या विभक्त पत्नीचा संताप

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान एरवी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच टीकेचे धनी होत असतात आता तर त्यांच्या विभक्त पत्नीनेच त्यांना फैलावर घेतले आहे.

रेहम खान यांनी असे म्हटले आहे की, काही अज्ञात लोकांनी रविवारी २ जानेवारीला त्यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर संतापलेल्या रेहम यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर शरसंधान केले आहे. त्या म्हणतात की, पाकिस्तान हा इम्रान खान यांच्या कार्यकाळात भित्र्यांचा, वाटमाऱ्यांचा आणि लोभी लोकांचा देश आहे.

त्यांनी ट्विट केले आहे की, माझ्या पुतण्याच्या लग्नाहून परतत असताना मोटारबाईकवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी माझ्या गाडीवर गोळीबार केला. अर्थात, मी त्याआधीच माझी गाडी बदललेली होती, त्यामुळे प्रकरण जीवावर बेतले नाही. माझे स्वीय सहाय्यक आणि चालक अशी दोन माणसे माझ्या त्या गाडीत होती. हा इम्रान खान यांचा नया पाकिस्तान आहे का? मग अशा भित्र्यांच्या, लोभ्यांच्या आणि वाटमाऱ्यांच्या देशात तुमचे स्वागत आहे.

हे ही वाचा:

मविआ सरकारच्या काळात चौथीच्या पुस्तकात इस्लामी शिकवण

घाटकोपरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला आग

४०० आदिवासींना एकत्र करून धर्मांतर करण्याचा प्रयत्न?

लसीकरणात भारत जगात सर्वोत्तम; पंतप्रधान मोदींचे कौतुक

 

या हल्ल्यात रेहम खान यांना कोणतीही दुखापत झाली नाही पण या घटनेमुळे त्या प्रचंड संतापल्या आणि त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला. रेहम खान या ब्रिटिश-पाकिस्तानी असून त्या पत्रकार आहेत. २०१४मध्ये त्यांचा इम्रान खानशी विवाह झाला. त्यानंतर ३० ऑक्टोबर २०१५मध्ये त्या विभक्त झाल्या. ४८ वर्षीय रेहम या इम्रान खान यांच्या कारभारावर सातत्याने टीका करत असतात.

इम्रान खान यांनी पाकिस्तानची सत्ता मिळविल्यापासून त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल लोकांमध्ये प्रचंड रोष आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा