29.2 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरराजकारणपेपरफुटी आरोपींसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट; पंतप्रधान मोदींचा इशारा

पेपरफुटी आरोपींसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट; पंतप्रधान मोदींचा इशारा

पेपरफुटीविरोधात पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय

Google News Follow

जंतर-मंतरवर सुरू असलेल्या पेपरफुटी प्रकरणावरील आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ठामपणे सांगितले की, पेपरफुटीच्या दोषींना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्स स्थापन केले जातील. देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडले जाणार नाही.

मंगळवारी, संसदीय बैठकीत ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’च्या (NDA) खासदारांना संबोधित करताना त्यांनी खासदारांना तरुणांशी संवाद साधण्याचे आणि त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचे आवाहन केले. तसेच, पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांमध्ये सहभागी असलेल्यांना कठोरतम शिक्षा झाली पाहिजे, यावरही त्यांनी भर दिला. पेपर लीक आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनांवर पंतप्रधान मोदींची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.

हे ही वाचा:

तुकाराम मुंढेंची बीएमसीच्या मुख्यालयात धाड, कॅन्टीन सील

आम्ही दहशतवादी आहोत का म्हणणाऱ्या ‘विद्यार्थ्यांच्या’ हातात तलवारी, कुकरी

काँग्रेसची उफराटी तऱ्हा; दिल्लीत विद्यार्थ्यांचे समर्थन, केरळात लाठीमार

भारतासाठी इशारा; झिम्बाब्वेने नवं अस्त्र बाहेर काढलं!

पंतप्रधान मोदींच्या विधानावर ‘सीजेपी’ची प्रतिक्रिया

जंतर-मंतर येथे आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने पंतप्रधानांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली.”धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे,” असे लिहिले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा