30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणभ्रष्टाचाऱ्यांना सोलले आणि मुंबई मनपा निवडणुकीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोडला नारळ

भ्रष्टाचाऱ्यांना सोलले आणि मुंबई मनपा निवडणुकीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोडला नारळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना केले आश्वस्त

Google News Follow

Related

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग मुंबई भेटीत फुंकले. मुंबईला केंद्रस्थानी ठेवत अनेक योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले आणि पंतप्रधानांनी मुंबईप्रमाणेच शहरांच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. मुंबईत याआधी सत्तेवर असलेल्यांच्या नाकर्तेपणावर मोदी यांनी बोट ठेवले.

विकासाच्या आड येणाऱ्यांमुळे अनेक प्रकल्प रखडतात, पण आम्ही कधीही विकासाच्या आड आलो नाही. बाकी राजकारण होत राहते मात्र विकासाच्या आड यायचे नाही, हा आमचा दृष्टिकोन आहे. विकासकामांसाठी येणारा पैसा त्याच कामासाठी वापरला गेला पाहिजे तो भ्रष्टाचारात गेला तर विकास होणार तरी कसा, असे म्हणत पंतप्रधानांनी गेल्या २५ वर्षांतील मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर एकप्रकारे बोट ठेवले. राजकीय स्वार्थासाठी आम्ही कधीही विकासात खीळ घातली नाही, असे सांगताना गेल्या महाविकास आघाडी सरकारने कसे सगळे प्रकल्प स्थगित केले होते, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विकसित भारत निर्माणात आमच्या शहरांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यात महाराष्ट्राचा विचार करू येणाऱ्या २५ वर्षात राज्यातील अनेक शहर भारतातील वाढीला मदत करतील. गती देतील. मुंबईला भविष्यासाठी तयार करणे हे डबल इंजिनची प्राथमिकता आहे. आमची ही कटिबद्धता मेट्रोत दिसते. २०१४पर्यंत मुंबईत फक्त १०-११ किमी पर्यंत मेट्रो चालत होती. पण डबल इंजिन सरकार बनवले तेव्हापासून वेगाने विस्तार झाला. काही काळ वेग कमी होता पण शिंदे फडणवीस यांची जोडी येताच पुन्हा वेगाने काम होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन व भूमिपूजन, लोकार्पण यावेळी झाले. त्यात मेट्रो ७ व २ अ, सांडपाणी प्रकल्प, फेरीवाल्यांसाठी स्वनिधी योजना अशा योजनांना पंतप्रधानांनी हिरवा कंदिल दाखविला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की,  जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांची प्राथमिकता विकासाची नसेल, तोपर्यंत वेगाने विकास होणार नाही. शहरात सुशासन समर्पित शासन असते तेव्हाच हे काम होतात. म्हणून मुंबईच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका मत्त्वाची आहे. बजेटची कोणतीही कमी नाही. पण हक्काचा पैसा योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे. जर तो भ्रष्टचारावा वापरला जाईल, विकासकामांना स्थगिती दिली जाईल तर उज्ज्वल भविष्य कसे होईल?  एनडीए सरकार कधीही विकासाच्या आड राजकारण आणले नाही. राजकीय स्वार्थासाठी कधी विकासाच्या आड भाजपाचे सरकार आले नाही. पीएम स्वनिधी याचे उदाहरण आहे. शहरात ठेलेवाले, फेरीवाले शहरांचे महत्त्वाचे अंग आहे. त्यांच्यासाठी योजना आणली, बँकांतून कर्ज मिळेल याची व्यवस्था केली देशभरात ३५ लाख लोकांना लाभ मिळाला आहे. महाराष्ट्रात ५ लाखांना कर्ज मिळाले आहे. १ लाखांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. हे काम आधीच व्हायला हवे होते. पण मधल्या काळात डबल इंजिन सरकार नसल्यामुळे कामांत अडथळे आणले गेले. ज्याचे नुकसान या लाभार्थ्यांना झाले. हे होऊ नये म्हणून दिल्ली ते महारआष्ट्र, मुंबईपर्यंत सगळ्यांचा प्रयास असला पाहिजे की शहरात सुशासन हवे.

हे ही वाचा:

याकूबची कबर,हिरेनची हत्या….सगळ्याचं श्रेय उद्धव ठाकरेंचंच

सुकेश रोज माझ्याशी फोनवर बोलत असे, पण तो तुरुंगातून बोलत होता हे नंतर कळले!

‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतला अटक

इजिप्तचा झाला ‘पाकिस्तान’; मशिदींवर वारेमाप खर्च केल्याने आली दिवाळखोरी

आज देशात रेल्वेला आधुनिक बनविण्यासाठी मिशन मोडवर काम सुरू आहे. मुंबई लोकल व महाराष्ट्र रेल्वे कनेक्टिव्हिटाल फायदा होई. डबल इंजिन सरकार सामान्य माणसाला आधुनिक सुविधा साफसफाई वेगाचा अनुभव देऊ इच्छितो. जो पूर्वी केवळ ठऱाविक वर्गाला मिळत होता. आज रेल्वे स्टेशनलाही एअरपोर्टप्रमाणेच विकसित केले जात आहे. जुन्या छत्रपती शिवाजी टर्मिनसचाही कायापालट होईल. लोकल आणि एक्स्प्रेस रेल्वेसाठी विविध सुविधा बनलीत लक्ष्य एकच सामान्य प्रवाशांना उत्तम सुविधा मिळेल. स्टेशन रेल्वे सेवेसाठी मर्यादित राहणार नाहीत. मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी येईल. बस, टॅक्सी, ऑटो प्रत्येक साधन एकाच छताखाली असतील. यामुळे प्रवाशांचा फायदा बोईल. त्याला देशाच्या प्रत्येक शहरात आम्ही विकसित करू, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

पंतप्रधान मोदींंनी दिला डिजिटल मंत्र

स्वनिधीच्या लाभार्थ्यांना डिजिटल ट्रेनिंगसाठी ३२५ कॅम्प लावले गेले. अनेकजण डिजिटल वापर करू लागले. अनेकांना आश्चर्य वाटेल की एवढ्या कमी काळात स्वनिधी लाभार्थ्यांना ५० हजार कोटींचे डिजिटल ट्रान्धॅक्शन केले आहे. ज्यांना आपण अशिक्षित म्हणतो त्या फेरीवाल्यांनी ५० हजार कोटींचे काम केले आहे. हा पराक्रम, हा मार्ग निराशावाद्यांसाठी मोठे उत्तर आहे. जे म्हणत होते, फेरीवाल्याकडे डिजिटल कसे होईल. सबका प्रयास असेल असंभव काहीही नाही. सबका प्रयासमधून आम्ही मुंबईला विकासाच्या नव्या शिखरावर नेऊ तुम्ही माझ्यासोबत तला तुम्ही १० पावले टाकाल मी ११ पावले टाकीन कारण ठएलेवाले, सावकाराकडून पैसे घेत त्यातून पैसे कापून घेतले जात. पैसे परत केले नाही तर पुन्हा कर्ज मिळत नसे. व्याज वाढत जात असे, मुले भुकेली झोपत असत. त्यासाठी ही योजना आहे. जेवढा डिजिटल उपयोग कराल डिजिटल झालात तर व्याजाचे पैसे लागणार नाहीत. किती पैसे वाचतील ते पाहा. शिक्षणासाठी उपयोग होईल. मी तुमच्यासोबत आहे. वचन द्यायला आलोय. शिंदे फडणवीस यांचे हे सरकार आपल्या स्वप्नांना पूर्ण करेल.हा विश्वास आहे, असेही मोदी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा