26 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरक्राईमनामा'ड्रामा क्वीन’ राखी सावंतला अटक

‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतला अटक

अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर अटकेची टांगती तलवार

Google News Follow

Related

‘ड्रामा क्वीन’ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंतला मुंबईतील आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. एका मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याप्रकरणी आरोप राखी सावंतवर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची दखल घेत त्यावरून पोलिसांनी कारवाई केली आहे. या महिलेचा फोटो राखीनं एका पत्रकार परिषदेत व्हायरल केला होता. त्या संदर्भात संबंधित मॉडेलनं पोलिसांत तक्रार दाखल केली होती त्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

कोण आहे अभिनेत्री आणि काय आहे तक्रार

शरलीन चोप्राचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ राखीनं पत्रकार परिषदेत दाखवला होता आणि त्यावरून आक्षेपार्ह भाषेत विधानही केलं होतं म्हणून राखीविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.

अभिनेत्री शरलीन चोप्रानं यासंदर्भात एक ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे. काल राखी सावंतनं यासंदर्बात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळला’,अशी माहिती शरलीन चोप्रानं या ट्वीटमध्ये दिली आहे. दरम्यान, राखी सावंतला थोड्या वेळात न्यायालयात हजर केलं जाणार असून त्यानंतर तिला पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी मिळेल याबाबत चित्र स्पष्ट होईल.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण

महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक

डान्स अकॅडेमीचं होणार होतं उद्घाटन

राखी सावंत आज दुपारी तिचा पती आदिल खान दुरानी याच्यबरोबरच्या भागीदारीमध्ये सुरू केलेल्या डान्स अकॅडेमीचं उद्घाटन करणार होती. दुपारी ३ च्या सुमारास हे उद्घाटन केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता राखी सावंतच्या अटकेमुळे हे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,913चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा