25 C
Mumbai
Thursday, February 9, 2023
घरराजकारणसव्वा लाख फेरीवाल्यांना पंतप्रधान स्वनिधीचा लाभ देऊ!

सव्वा लाख फेरीवाल्यांना पंतप्रधान स्वनिधीचा लाभ देऊ!

देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा

Google News Follow

Related

प्रधानंमंत्री आपण लोकप्रिय आहात जर लोकप्रियतेबाबत स्पर्धा झाली तर पहिल्या क्रमांकावर मुंबई शहर असेल. इतके प्रेम मुंबईकरांचे तुमच्यावर आहे, अशा शब्दांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

त्याआधी विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. नंतर सगळ्यांचा ताफा बीकेसी येथील मुख्य कार्यक्रमाकडे रवाना झाला. पंतप्रधान मंचावर विराजमान झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी भाषण केले.

ते म्हणाले की, आपल्या शब्दावर विश्वास ठेवून २०१९ला महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आणले होते. पण काही लोकांनी बेईमानी केली. पण बाळासाहेबांचे सच्चे अनुयायी एकनाथ शिंद यांच्यामुळे मनातील सरकार तयार झाले. आता महाराष्ट्र विकासात जोराने धावू लागला आहे. अनेक भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान स्वनिधीचा कार्यक्रम महत्वाचा आहे. कोविडच्या वेळेस फेरीवाल्यांचा विचार केला होता. त्यांच्यासाठी स्वनिधीची रचना केली. पण तेव्हा तत्कालिन महाराष्ट्र सरकाने तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी या गरिबांना जे पैसे मिळणार आहे ते स्थगित केले, लागू केले नाही.  केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या नेतृत्वात बैठक केली व त्यात आम्ही ठरवले की १ लाख फेरीवाल्यांना स्वनिधीचा फायदा देऊ आणि सांगायला हर्ष होतोय की १ लाखाचा आकडा पार करून १ लाख १५ लाखांपर्यंत ही संख्या पोहोचली आहे.

हे ही वाचा:

सुकेश रोज माझ्याशी फोनवर बोलत असे, पण तो तुरुंगातून बोलत होता हे नंतर कळले!

इजिप्तचा झाला ‘पाकिस्तान’; मशिदींवर वारेमाप खर्च केल्याने आली दिवाळखोरी

पंतप्रधानांच्या दौऱ्यावरून ‘सामना’मध्ये पोटदुखी

पीएफआयच्या ‘पत्रकारा’ला अटक

फडणवीस यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या हस्ते हे काम आपण करतो आहोत. पंतप्रधानांनी ज्या योजनांचे भूमिपूजन केले त्यांचे उदघाटनही त्यांच्याच हातून होत आहे. हे कल्चर आपल्यामुळेच आले आहे. त्याबद्दल आभार. या शहरात रोज हजारो करोडो लीटर पाणी प्रक्रिया न करता समुद्रात सोडत होते. समुद्रातील पाण्याला त्यामुळेच वास त्यामुळे होता. २०-२५ वर्षे महापालिकेवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी स्वतःची घरं भरली. शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केला नाही. मुख्यमंत्री असताना पालिकेला सांगितलं एसटीपी तयार करावे लागतील. पण कुठल्या नियमांच्या आधारे करायचे ते त्यांना माहीत नव्हते. मी पंतप्रधानांकडे गेलो. त्यांनी पुढाकार घेऊन ही नियमावली तयार केली. त्यानंतरही तीन वर्षे मुंबई महानगरपालिका हे काम करू शकले नाहीत. करण्याची त्यांची इच्छा होती पण तत्कालिन सरकारशी त्यांचे जमत नव्हते. कारण त्यांना हिस्सेदारी मिळाली नव्हती. शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली त्याला गती दिली.

रस्त्यांच्या बाबतीतही आम्ही ठोस निर्णय घेत आहोत. आता काँक्रिटचे रस्ते होतील. ते रस्ते ४० वर्षे टिकतील त्यामुळे प्रतिवर्षी नवे रस्ते बनवावे लागणार नाहीत. पंतप्रधानजी आपले आभार छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन तो मुंबईची ओळख आहे त्याचे नवे रूप देण्यासाठी आपण विकासाचा कार्यक्रम हाती घेतला तसे नव्या रूपातील सीएसटी पुन्हा मिळत आहे. त्याचेही भूमिपूजन होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,906चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा