29 C
Mumbai
Monday, January 30, 2023
घरक्राईमनामापीएफआयच्या 'पत्रकारा'ला अटक

पीएफआयच्या ‘पत्रकारा’ला अटक

पीएफआयच्या हिट पथकाच्या निशाण्यावर केरळमधील अनेक नेते

Google News Follow

Related

केंद्रीय गृहमंत्रालयाने पीएफआयवर बंदी घातली असून त्यांच्या नेत्यांवर कारवाई करताना अटक केली आहे.त्यांचे काही लोक स्लीपर सेलच्या रूपात बाहेर लपून बसले असून त्यांच्यावर तपास यंत्रणा लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू केली आहे.

केरळमध्ये समाजविघातक विध्वंसकारी कारवायांची योजना आखत असलेला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका पत्रकाराला अटक करण्यात आली आहे, . मंगळवारी एनआयएने पीएफआयशी संबंधित संशयितांच्या घरांवर छापे टाकून हि कारवाई करण्यांत आली.

एन आय ए कडून मिळालेल्या माहितीनुसार, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया समाजात असंतोष निर्माण करणार्‍या कारवायांमध्ये सामील होता. त्यांचे सदस्य, पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे काम करत होते. एनआयएने अटक केलेला पत्रकार हा पीएफआयशी संबंधित होता आणि तो केरळमध्ये सक्रिय असलेल्या इतर धर्माच्या नेत्यांची माहिती गोळा करून त्यांना देत असे.ही माहिती पीएफआयच्या हिट स्क्वॉडला देत असे, असा आरोप त्या पत्रकारावर आहे. ‘मोहम्मद सादिक’ असे या पत्रकाराचे नाव असून तो मनेझाथु थाट्टा येथील रहिवासी आहे. त्याला कोल्लम जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

मोहम्मद सादिकला दिली मोठी जबाबदारी
पीएफआयने मोहम्मद सादिक नावाच्या तरुणाला आपला पत्रकार बनवले होते. तो केरळमधील इतर धर्मातील प्रमुख लोकांची माहिती गोळा करत होता ही माहिती पीएफआयच्या हिट स्क्वॉडपर्यंत पोहोचवून अनेक नेत्यांवर हल्ला करण्याची योजना होती.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

इस्लामिक शक्ती स्थापन करण्याचा कट
पीएफआयचे नेटवर्क तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये लष्कर-ए-तैयबा , इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया म्हणजेच आयसिस आणि अल-कायदा या नावांचा समावेश आहे. यांनी जिहादच्या नावाखाली देशातील इतर धर्माच्या लोकांवर हल्ले केले आहेत. पीएफआयला देशात इस्लामिक सत्ता स्थापन करायची होती.
मोहम्मद सादिकला दिली मोठी जबाबदारी
पीएफआयने मोहम्मद सादिक नावाच्या तरुणाला आपला पत्रकार बनवले होते. तो केरळमधील इतर धर्मातील प्रमुख लोकांची माहिती गोळा करत होता ही माहिती पीएफआयच्या हिट स्क्वॉडपर्यंत पोहोचवून अनेक नेत्यांवर हल्ला करण्याची योजना होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,917चाहतेआवड दर्शवा
2,003अनुयायीअनुकरण करा
61,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा