31 C
Mumbai
Tuesday, April 21, 2026
घरराजकारणकाँग्रेसने केले घाणेरडे आणि 'नग्न' राजकारण

काँग्रेसने केले घाणेरडे आणि ‘नग्न’ राजकारण

एआय शिखर परिषदेतल्या आंदोलनावरून काँग्रेसवर हल्लाबोल

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शिखर परिषदेत काँग्रेसने केलेल्या कथित ‘शर्टलेस’ आंदोलनावरून काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात काँग्रेसने घाणेरडे आणि नग्न राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. मेरठ येथे नमो भारत रेल्वे आणि मेरठ मेट्रो रेल्वे विस्तार प्रकल्पांसह विविध विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसचे वर्तन “विचारधारेने दिवाळखोर आणि राजकीयदृष्ट्या दरिद्री” असल्याचे म्हटले.

“देश विकसित राष्ट्र बनवण्यासाठी नागरिक रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत, पण काही राजकीय पक्षांना भारताचे यश पचत नाही,” असे ते म्हणाले. दिल्लीतील शिखर परिषदेला ८० हून अधिक देशांचे प्रतिनिधी आणि सुमारे २० राष्ट्रप्रमुख उपस्थित होते, याचा देशाला अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी आरोप केला की काँग्रेस नेत्यांनी परदेशी पाहुण्यांसमोर कपडे काढून आंदोलन केले. “देशाला आधीच माहित आहे की तुम्ही ‘उघडे’ पडले आहात, मग आणखी कपडे काढण्याची काय गरज होती?” असा टोला त्यांनी लगावला.

हे ही वाचा:

सोन्या-चांदीत तीव्र घसरण

भारत-अमेरिका व्यापार कराराची बैठक पुढे ढकलली

आठवड्याच्या शेवटी सोन्या-चांदीत तेजी

भारत ब्राझिलमध्ये रेअर अर्थचा घसघशीत करार

काँग्रेस नेत्यांना आपल्याबद्दल द्वेष असल्याचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले, “ते माझी कबर खोदू इच्छितात, माझ्या आईलादेखील शिवीगाळ करतात. भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विरोध करणे त्यांच्या राजकारणाचा भाग असू शकतो, ते आम्ही सहन करू. पण एआय ग्लोबल समिट हा भाजपचा कार्यक्रम नव्हता; तो देशाचा कार्यक्रम होता.”

इतर विरोधी पक्षांचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की ही कृती केवळ काँग्रेस नेत्यांपुरती मर्यादित होती. त्यात तृणमुूल काँग्रेस, डीएमके, बहुजन समाजवादी पक्ष, जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स यांसारख्या सहयोगी पक्षांचा यात सहभाग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बजेट अधिवेशनादरम्यान ४ फेब्रुवारी रोजी लोकसभेत महिल खासदारांनी त्यांच्या आसनासमोर फलक घेऊन घोषणाबाजी केल्याच्या घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. संसदेचे कामकाज ठप्प करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. “संसद चालू दिली नाही तर त्याचा सर्वाधिक फटका त्यांच्या सहयोगी पक्षांनाच बसतो,” असे ते म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा