35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरधर्म संस्कृतीपंतप्रधान मोदी जाणार देवभूमीत! बाबा केदारनाथचे घेणार आशीर्वाद

पंतप्रधान मोदी जाणार देवभूमीत! बाबा केदारनाथचे घेणार आशीर्वाद

Google News Follow

Related

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवभूमी उत्तराखंडमध्ये जाणार आहेत. पुढली महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरच्या ५ तारखेला पंतप्रधान मोदींचा उत्तराखंड दौरा निश्चित झाला आहे. आदि शंकराचार्य यांच्या समाधीचे उदघाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे उत्तराखंड येथे जाणार आहेत. तर यावेळी आदि शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे देखील पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार आहे.

२०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रचंड पुराने राज्यात बरेच नुकसान झाले होते. या वेळी आदि शंकराचार्य यांची समाधीही नष्ट झाली होती. या नष्ट झालेल्या समाधीची पुन्हा उभारणी करण्यात आली आहे. या पुनर्बांधणीचे काम पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रकल्पातील प्रगतीत स्वतः पंतप्रधान जातीने लक्ष घालून सातत्याने आढावा घेत होते. तसेच त्यावर देखरेखही करत होते.

हे ही वाचा:

एसटीला गळफास घेऊन आणखी एका चालकाने गमावले प्राण

रिझर्व्ह बँकेला तीन वर्षासाठी नवी ‘शक्ती’

बंदूक रोखून जालन्यात लुटली बँक

‘थलैवा’ रजनीकांत हॉस्पिटलमध्ये

या आपल्या दौऱ्यात सरस्वती आस्थापथ येथे पूर्ण झालेल्या तसेच सुरू असलेल्या कामाचाही पंतप्रधान आढावा घेणार आहेत. पंतप्रधान सार्वजनिक सभेलाही संबोधित करतील. सरस्वती रिटेनिंग वॉल, आस्था पथ, आणि मंदाकिनी रिटेनिंग वॉल, आस्थापथ, तीर्थ पुरोहितांची घरे आणि मंदाकिनी नदीवरचा गरुड छत्ती पूल अशा अनेक पूर्ण झालेल्या पायाभूत सुविधा कामांचे उद्‌घाटन पंतप्रधान करतील.

ही प्रकल्प कामे पूर्ण करण्यासाठी १३० कोटींहून अधिक खर्च झाला आहे. संगम घाटाचा पुनर्विकास, प्रथमोपचार आणि पर्यटक सुविधा केंद्र, व्यवस्था कार्यालय आणि रुग्णालय, दोन अतिथीगृह, पोलीस स्टेशन, कमांड आणि कंट्रोल केंद्र, मंदाकिनी आस्थापथ रांग व्यवस्था, पावसासाठी संरक्षक, आणि सरस्वती नागरी सुविधा इमारत अशा अनेक पायाभूत सुविधा कामांचे पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होतील. या कामांसाठी १८० कोटींहून जास्त खर्च येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा