28 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरराजकारणदेशभरातल्या १०० रेल्वे स्थानकांवर पीएम- वाणी योजना सुरू

देशभरातल्या १०० रेल्वे स्थानकांवर पीएम- वाणी योजना सुरू

Related

देशभरातल्या १०० रेल्वे स्थानकांवर सार्वजनिक वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील मिनी रत्न कंपनी रेलटेलने प्रधानमंत्री वायफाय एक्‍सेस नेटवर्क इंटर फेस-पीएम- वाणी योजना सुरू केली आहे.

रेलटेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनीत चावला यांनी ऑनलाईन मीटिंगद्वारे सोमवार, ९ मे रोजी या योजनेची सुरुवात केली. अँड्रॉइड फोन वापरकर्ते गूगल प्ले स्टोअरवरून मोबाईल ऍप ‘वाय-डॉट’ डाऊनलोड करून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. एसएसआयडी या आधीच्या पद्धतीखेरीज नागरिक आता रेल्वे स्थानकांवर मोबाईल ऍपच्या माध्यमातून वायफाय सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

प्रधानमंत्री वायफाय एक्‍सेस नेटवर्क इंटर फेस ही दूरसंवाद विभागाची महत्‍वाकांक्षी योजना असून जून २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व ६ हजार १०२ रेल्वे स्थानकांवर ही योजना लागू करण्याचे सरकारचे धोरण आहे. एकूण एक हजार रेल्वे स्थानके १० जूनपर्यंत तर २० जूनपर्यंत तीन हजार रेल्वे स्थानके आणि ३० जून २०२२ पर्यंत सर्व ६ हजार १०२ रेल्वे स्थानकांवर ही योजना लागू होणार आहे. या योजनेअंतर्गत १७ हजार ७९२ वायफाय हॉटस्फोट रेल्वे स्थानकांवर लावण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

चेन्नईने सुपर किंग्स संघाने केले जडेजाला अनफॉलो

आम्ही घरूनच काम करणार, म्हणत कर्मचाऱ्यांनी दिला राजीनामा

संभाजी राजेंच्या नव्या संघटनेची घोषणा

मुंब्र्यात वसुली सरकार, पोलिसांनीच व्यापाऱ्याला लुटले

दरम्यान, सार्वजनिक अनुकूल सेवेचा शुभारंभ करताना, सीएमडी पुनीत चावला म्हणाले, “रेलटेल हे देशातील सर्वात व्यापक एकात्मिक वाय-फाय नेटवर्क असून वाय-फाय वापरकर्त्यांच्या मोठ्या संख्येला समर्थन देत आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा