27 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरक्राईमनामाशिवसेना जिल्हाप्रमुखाचा 'गुटखा' जप्त?

शिवसेना जिल्हाप्रमुखाचा ‘गुटखा’ जप्त?

Related

मंगळवारी रात्री केज तालुक्याच्या सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी छापेमारी केली. या कारवाई दरम्यान पोलिसांकडून लाखो रुपयांच्या गुटख्यासह ३३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव समोर आले आहे.

केज तालुक्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी बीडमधील इमामपूर, नांदूरघाट आणि शहरातील काही गोडाऊनवर छापे मारले. यात लाखो रुपयांच्या गुटख्यासह ३३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान या गुटखा तस्करी प्रकरणात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव समोर आले असून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

भाजपाने काढली ठाकरे सरकारची प्रेतयात्रा

शेळी पालनाच्या बहाण्याने सुरू होता ड्रग्ज कारखाना

कोकणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कलगीतुरा!

पवई येथील ह्युन्डाई कार सर्व्हिस सेंटर आगीच्या तडाख्यात

पोलिसांनी संबंधित गोदामावर छापा टाकल्यानंतर खांडे यांनी तिथे उपस्थित असलेल्या आपल्या माणसांना फोन करून ‘पोलिसांना सांगा, हा कुंडलिक खांडेंचा गुटखा आहे, तिथून निघून जा’ असा निरोप देत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

या प्रकरणी कुंडलिक खांडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे. या प्रकरणात एकूण चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत.  मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी गुटखा प्रकरणाशी माझा संबंध नाही, असे म्हणत मला एका शिवसैनिकाचा फोन आला होता आणि महिलांनाही पोलीस अटक करत असल्याचे तो म्हणाला. मी घटनास्थळी गेलो. गुटखा माफियांना अटक करा, मात्र त्यांच्या घरातील महिलांना अटक का करता? असा जाब विचारल्याने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला गेला, अशी प्रतिक्रिया कुंडलिक खांडे यांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा