27.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरराजकारणपश्चिम बंगाल निवडणुकीने घेतली प्रशांत किशोर यांची विकेट

पश्चिम बंगाल निवडणुकीने घेतली प्रशांत किशोर यांची विकेट

Google News Follow

Related

चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले खळबळजनक विधान

देशातील पाच राज्यांच्या सुरू असलेल्या मतमोजणीत पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणुकीत विजयी ठरत असलेल्या तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक पक्षांचे निवडणूक सल्लागार म्हणून काम पाहिलेल्या प्रशांत किशोर यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आपण हे निवडणूक व्यवस्थापनाचे काम यापुढे सोडणार असल्याचे सांगितले. ममता बॅनर्जी यांनी यश मिळविल्यानंतरही किशोर यांची विकेट पडल्याने राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना मिळालेले यश, तमिळनाडूत झालेला सत्तापालट या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्या या डावपेचांकडे, व्यवस्थापनाकडे कौतुकाने पाहिले जात होते. पण त्यांनी या कामातून आता बाहेर पडण्याचे ठरविल्यामुळे ते खरे आहे की काही काळापुरता हा विराम आहे, याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

ऑक्सिजनच्या परिवहनासाठी महिंद्रांकडून प्रयत्न

अदर पुनावालांना धमकावणारे शिवसेनेचे गुंड?

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा निसटता विजय

निवडणुक आयोग विजय मिरवणुकांवर नाराज

प्रशांत किशोर यांच्याशी निवडणुकांसंदर्भात चर्चा सुरू असताना अँकरने त्यांना विचारले की, तुम्ही यानंतरही ममता बॅनर्जींसोबत काम करणार आहात का, त्यावर प्रशांत किशोर यांनी सांगितले की, यापुढे आपण आयपॅकशी नाते तोडणार आहोत. त्यांचे अधिकारी आता ते काम पुढे नेतील. मी वेगळ्या कामात लक्ष घालेन. त्यावर त्या अँकरलाही धक्का बसला आणि त्याने हे खरे आहे का, अशी विचारणा केल्यावर प्रशांत किशोर म्हणाले की, हो मी आता माझ्या कुटुंबियांना वेळ देणार आहे. गेले कित्येक महिने मी माझ्या बायकोला आणि मुलाला भेटलेलो नाही. त्यामुळे आता कुटुंबाला वेळ देण्याचा माझा इरादा आहे. त्यानंतर पुढे काय वाढून ठेवले आहे ते पाहू. मला यापुढे हे काम करायचे नाही.
त्यावर पुन्हा एकदा अँकरने खात्री करून घेण्यासाठी खरोखरच हे काम आपण सोडण्याच्या तयारीत आहात का, असे विचारल्यावर मला आता हे काम करण्याची यापुढे इच्छा नाही, असे प्रशांत किशोर यांनी ठामपणे सांगितले. तेव्हा अँकरला धक्का बसला.
अँकरने त्यांना विचारले की, का असे पाऊल उचलत आहात? त्यावर ते म्हणाले की, जवळपास ८-९ वर्षे मी हे करत आहे. खूप आव्हानात्मक काम होते हे. आता मला यापासून दूर जायचे आहे.
यानंतर राजकारणात जाणार का, यावर ते म्हणाले की, मी यावर काहीही म्हणणार नाही. आयपॅकमधील माझ्या सहकाऱ्यांवर पुढील जबाबदारी टाकणार आहे.इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीच्या (आयपॅक) माध्यमातून किशोर यांनी निवडणूक व्यवस्थापनाचे काम पाहिले. त्यांनी आतापर्यंत भाजपा, काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस, वायएसआर काँग्रेस, द्रमुक या पक्षांना सल्ला देत त्यांच्या निवडणूक व्यवस्थापनाची धुरा वाहिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा