28 C
Mumbai
Thursday, August 18, 2022
घरराजकारण“आदिवासी मुलगी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहचते हे लोकशाहीचे सामर्थ्य”

“आदिवासी मुलगी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहचते हे लोकशाहीचे सामर्थ्य”

Related

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. मी द्रौपदी मुर्मू…. देशाच्या सर्वोच्च पदावर निवडून दिल्याबद्दल धन्यवाद, राष्ट्रपतीपदाची जबाबदारी मोठी असल्याचं सांगत त्यांनी सर्व देशवासीयांचे आभार मानले. शपथविधी झाल्यावर मुर्मू यांनी भाषण केले.

द्रौपदी मुर्मू आपल्या भाषणात म्हणाल्या की, “स्वतंत्र भारतात जन्मलेली मी देशाची पहिली राष्ट्रपती आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतंत्र भारतातील नागरिकांकडून आपल्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला या अमृत काळामध्ये वेगाने काम करावे लागेल.

“२६ जुलै हा कारगिल विजय दिवस आहे. हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयम या दोन्हींचे प्रतीक आहे. मी कारगिल विजय दिवसानिमित्त देशाच्या सैन्याला आणि देशातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देते.”

“राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणे ही माझी वैयक्तिक उपलब्धी नाही, ती भारतातील प्रत्येक गरिबाची उपलब्धी आहे. माझ्यासाठी ही खूप समाधानाची बाब आहे की, जे अनेक शतकांपासून वंचित होते, जे लोक राष्ट्रपतीपदापासून दूर होते. गरीब, दलित, मागासलेले आणि आदिवासी माझ्यामध्ये त्यांचे प्रतिबिंब पाहत आहेत. आज मी सर्व देशवासियांना, विशेषतः भारतातील तरुणांना आणि भारतातील महिलांना खात्री देते की, या पदावर काम करताना त्यांचे हित सर्वोतपरी असेल. माझ्या या नियुक्तीनंतर आजच्या भारतातील तरूणांना नव्या वाटेवर चालण्याचे धाडसही मिळत आहे. अशा प्रगतीशील भारताचे नेतृत्व करताना आज मला अभिमान वाटतो,” असेही द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

हे ही वाचा:

मै द्रौपदी मुर्मू….. देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींनी घेतली शपथ!

ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद!

मविआ सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी होती!

अग्निपथमध्ये नौदल प्रवेशासाठी महिलांची पसंती

“जेव्हा आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहोत, अशा महत्त्वाच्या काळात मला देशाने राष्ट्रपती म्हणून निवडले आहे. आजपासून काही दिवसांनी देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. देश स्वातंत्र्याचे ५० वे वर्ष साजरे करत होता त्यावेळी माझ्या कारकीर्दीला सुरुवात झाली आणि आज स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात मला ही नवी जबाबदारी मिळाली आहे, हा देखील योगायोग आहे,” असे मुर्मू म्हणाल्या.

ओडिशातील एका छोट्या आदिवासी गावातून मी माझा जीवन प्रवास सुरू केला. मी ज्या पार्श्‍वभूमीतून आली आहे, सुरुवातीचे शिक्षण घेणे हे माझ्यासाठी स्वप्नासारखे होते. पण अनेक अडथळे येऊनही माझा निश्चय पक्का राहिला आणि मी कॉलेजला जाणारी माझ्या गावातील पहिली मुलगी ठरले. गरीब घरात जन्मलेली मुलगी, दुर्गम आदिवासी भागात जन्मलेली मुलगी भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचू शकते हे आपल्या लोकशाहीचे सामर्थ्य आहे, असे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,912चाहतेआवड दर्शवा
1,918अनुयायीअनुकरण करा
23,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा