27 C
Mumbai
Sunday, March 15, 2026
घरराजकारणमहाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होणार!

महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होणार!

Google News Follow

Related

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मोठा विजय झाला असून यामध्ये पाच उमेदवार विजयी झाले आहेत. याच विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपा आमदार आणि अपक्ष आमदारांचे आभार मानले आहेत. फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा विजय झाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी विशेषतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपाला यश मिळण्यामध्ये अनेक अपक्ष आमदारांची मदत आहे. तसेच मविआतील नाराज आमदारांनीदेखील भाजपाला मतदान केलं आहे. त्या सर्व आमदारांचे आभार चंद्रकांत पाटील यांनी मानले आहेत.
तसेच सध्या जी शिवसेनेमध्ये परिस्थिती सुरु आहे त्यावरसुद्धा चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, सरकार असून काय फायदा? स्वतःचे आमदार जर खुश नसतील नाराज असतील तर सत्ता काय कामाची? असे सवाल चंद्रकांत पाटील यांनी केले आहेत. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार असून समजनेवालो इशारा काफी हे! असा टोला यावेळी चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

हे ही वाचा:

गटनेतेपदावरून हटवल्यावर एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरून ‘शिवसेने’ला हटवले

एकनाथ शिंदे नाराज असल्याचे राऊतांनी केले कबुल

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे २८ आमदार फुटले

१३ आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; ठाकरे सरकार अडचणीत

दरम्यान, भाजपाचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड हे पाचही उमेदवार विजयी ठरले आहेत. एवढेच नव्हे तर भाजपाने ११३ मते हाताशी असतानाही तब्बल १३३ मते मिळवित महाविकास आघाडीला भगदाड पाडले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा