26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरराजकारणएकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे २८ आमदार फुटले

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे २८ आमदार फुटले

Related

विधान परिषदेत महाविकास आघाडी सरकारला भाजपाने दणका दिल्यानंतर शिवसेनेत आता प्रचंड नाराजी नाट्य सुरू आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह २८ आमदार फुटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठाकरे सरकार पडणार असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

एकनाथ शिंदे हे विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते सुरतमध्ये मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यांच्यासोबत १३ आमदार आहेत. मात्र, हे १३ आमदार कोण हे अजून अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकनाथ शिंदे असलेल्या हॉटेलबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकार कोसळणार का? अशाही चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ शिंदे हे आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे शिवसेनेच्या गोटात मोठ्या हालचाली सुरू असून आमदार आणि खासदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

१३ आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; ठाकरे सरकार अडचणीत

“पराभवानंतर सरकार म्हणून विचार करण्याची गरज”

‘वाझेला सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री- देशमुखांचा दबाव’

राहुल गांधींची ईडीकडून पाचव्यांदा होणार चौकशी

महाविकास आघाडीची २१ मतं फुटल्याने महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रणनीती या साऱ्या निवडणूक प्रक्रियेत यशस्वी ठरल्याचे दिसून आले. भाजपाचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड हे पाचही उमेदवार विजयी ठरले आहेत. एवढेच नव्हे तर भाजपाने ११३ मते हाताशी असतानाही तब्बल १३३ मते मिळवित महाविकास आघाडीला भगदाड पाडले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा