32 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरराजकारणराहुल गांधींचा क्लबमधला व्हिडीओ व्हायरल

राहुल गांधींचा क्लबमधला व्हिडीओ व्हायरल

Google News Follow

Related

काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. राहुल गांधी यांचा नेपाळ दौऱ्यातील हा व्हिडीओ आहे. हा एका क्लबमधील व्हिडीओ असून यावरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

या व्हिडिओमध्ये राहुल गांधी हे काठमांडूमधील नाईट क्लबमध्ये दिसत आहेत. राहुल गांधी हे त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी म्हणून नेपाळला आल्याचे नेपाळमधील वृत्तपत्रांनी म्हटले आहे. भाजपचे अमित मालवीय यांनी ही व्हिडीओ ट्विट केली आहे.

हे ही वाचा:

चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा

जोधपूरमध्ये झेंड्यावरून दोन गटांत राडा

‘अ‍ॅमेझॉन’वर गुन्हा; औषधांची प्रिस्क्रिप्शनविना विक्री

राणा दांपत्याच्या घरात पालिकेला दिसले ‘अनधिकृत’

दरम्यान, सोशल मीडीयावर मात्र या व्हिडीओनंतर त्यांच्यावर काहींकडून टीका केली जात आहे तर काहीजण त्यांची बाजू घेऊन बोलत आहेत. राहुल गांधी हे नेहमीच देशाच्या परिस्थितीबद्दल बोलत असतात, पक्षाचीही अवस्था वाईट आहे पण ते याबद्दल खरोखरच गंभीर आहेत का, असा सवाल काही लोकांकडून उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे ते एका खासगी कार्यक्रमाला गेले असतील तर त्यात वावगे काय असाही सूर काही लोकांकडून सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,023अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा