32 C
Mumbai
Tuesday, May 17, 2022
घरक्राईमनामाराणा दांपत्याच्या घरात पालिकेला दिसले 'अनधिकृत'

राणा दांपत्याच्या घरात पालिकेला दिसले ‘अनधिकृत’

Related

राजद्रोहाच्या गुन्ह्याअंतर्गत तुरुंगात असलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्याच्या खारमधील घराला मुंबई महापालिकेने नोटीस जारी केली आहे. घराचं बांधकाम अनधिकृत अनधिकृत असल्याच्या तक्रारीनंतर ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

राणा दाम्पत्याच्या मुंबईच्या खारमधील फ्लॅटमध्ये अवैध बांधकाम असल्याचा आरोप करून मुंबई महापालिकेकडून या फ्लॅटचं ४ मे रोजी मोजमाप करण्यात येईल, अशी नोटीस पाठवण्यात आली आहे. सोसायटीचे पदाधिकारी आणि उपभोक्ता म्हणून रवी राणा यांच्या नावे ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

भारत जर्मनीत हे बंध होणार दृढ

लोकमान्य टिळकांवरच्या आक्षेपांना टिळकांच्या वंशजांचे सडेतोड उत्तर

राणा दाम्पत्यांच्या जामिनाची सुनावणी दोन दिवसांनी

धक्कादायक! मुंबई विद्यापीठाच्या लॉ अभ्यासक्रमाचा पेपर केला ‘सोप्पा’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. सोमवार, २ मे रोजी राणा दाम्पत्यांच्या या जामीन अर्जावर सुनावणी होती. मात्र आज निकालाचे लिखाण पूर्ण होऊ न शकल्याने आणि आज ईदची सुट्टी असल्याने राणा दाम्पत्याच्या जामिनावर आता बुधवार, ४ मे रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा न्यायालयातील मुक्काम आणखी दोन दिवस वाढला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,884अनुयायीअनुकरण करा
9,320सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा