32 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरराजकारणउद्धव ठाकरेंना कंटाळून ४० आमदार बाहेर पडले...

उद्धव ठाकरेंना कंटाळून ४० आमदार बाहेर पडले…

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या वागणुकीवर टाकला प्रकाश

Google News Follow

Related

उद्धव ठाकरे यांना कंटाळून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदार शिवसेनेतून निघून गेले असा घणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजी महाराज पार्कवर झालेल्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात झालेल्या काही वर्षांपूर्वीच्या संवादावर प्रकाश टाकला आणि उद्धव ठाकरे यांचे वागणे कसे होते याकडे लक्ष वेधले.

ते म्हणाले की, आज शिवसेना नाव, शिवसेनेचे चिन्ह याचे जे काही झाले आहे त्यामुळे वेदना होतात पण त्याला जबाबदार उद्धव ठाकरेच आहेत. नेहमी महाबळेश्वरचा प्रसंग सांगितला जातो पण मी एकदा उद्धव ठाकरे यांच्या मनात माझ्यासंदर्भात नेमके काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी थेट विचारणा केली. त्यांच्यासोबत हॉटेल ओबेरॉयमध्ये गेलो. त्यांना विचारले की, तुला मुख्यमंत्री व्हायचे  आहे का तर हो, तुला पक्षाचे प्रमुख व्हायचे आहे का तर हो. पण मला पक्षात काम काय आहे हे सांग. फक्त प्रचारापुरतं मला वापरू नका.

राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढत सांगितले की, त्यानंतर मी जाऊन हा सारा प्रसंग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सांगितला. ते म्हणाले सगळे मिटले आहे ना मग मी उद्धवला बोलावतो. मग मी बाहेर जाऊन तिथे बसलेल्या एकाला उद्धव यांना बाळासाहेब बोलावत आहेत असे सांगितले. तेव्हा उद्धवने येतो पाच मिनिटात असे सांगितले पण तो आला नाही. मग मी पुन्हा बोलावणे पाठवले तेव्हा तो निघून गेल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या याच वागण्याला कंटाळून हे अलिबाबा आणि ४० जण निघून गेले. मी त्यांना चोर म्हणणार नाही. कारण उद्धव ठाकरेंच्या स्वभावामुळेच ते निघून गेले.

हे ही वाचा:

जिच्या हाती ‘वंदे भारत’ची दोरी..

माहीममध्ये उभी राहतेय ‘दुसरी हाजीअली’; समुद्रातील अनधिकृत मजारीचा राज ठाकरेंनी केला पर्दाफाश

भारताने नाक दाबले, ब्रिटनचे तोंड उघडले…

मुंबईतले रस्ते आता ‘रॅपिड’ पद्धतीने खड्डामुक्तीकडे

नारायण राणे यांनाही असेच पक्षातून काढून टाकण्यात आले. ते पक्ष सोडणार असताना मी त्यांच्याशी बोललो आणि बाळासाहेबांना सांगितले. तेव्हा बाळासाहेब म्हणाले की, बोलाव त्यांना आपण बोलुया त्यांच्याशी. मग मी राणेंना फोन लावून मातोश्रीवर येण्यास सांगितले. तेव्हा बाळासाहेबांचा मला फोन आला आणि ते म्हणाले की, नको बोलावू. ते माझ्याशी बोलत असताना मागे कुणीतरी बोलत असल्याचा आवाज येत होता, असे सांगत राज ठाकरे यांनी यामागेही उद्धव ठाकरेच होते, असे संकेत दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा