24.5 C
Mumbai
Wednesday, January 21, 2026
घरराजकारणराजस्थानमध्ये काँग्रेसला खिंडार, माजी मंत्र्यांसह ३२ जणांचा भाजपात प्रवेश!

राजस्थानमध्ये काँग्रेसला खिंडार, माजी मंत्र्यांसह ३२ जणांचा भाजपात प्रवेश!

जयपूर येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रवेश

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीपूर्वी राजस्थान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय आणि माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते लालचंद कटारिया यांच्यासह पक्षाच्या ३२ नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.जयपूर येथील भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसच्या या नेत्यांसोबत त्यांच्या अनेक समर्थकांनी ‘हात’ सोडून ‘कमळ’ हाती घेतले आहे.नागौरचे अनेक दिग्गज जाट नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेस नेत्यांचा भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपमध्ये उत्साह आहे.राजस्थानमधील २५ पैकी २५ जागा जिंकू असा दावा भाजपने पुन्हा एकदा केला आहे.

काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांमध्ये गेहलोत सरकारमध्ये मंत्री असलेले लालचंद कटारिया, राजेंद्र यादव, माजी आमदार रिचपाल मिर्धा, खिलाडी लाल बैरवा, आलोक बेनिवाल, विजयपाल मिर्धा, माजी भिलवाडा जिल्हाध्यक्ष रामपाल शर्मा यांचा समावेश आहे. यापैकी कटारिया हे गेहलोत यांच्या जवळचे मानले जातात.तर खिलाडी लाल बैरवा हे सचिन पायलटचे कट्टर समर्थक मानले जातात. तर रामपाल शर्मा हे विधानसभेचे माजी अध्यक्ष सीपी जोशी यांच्या जवळचे आहेत.

हे ही वाचा:

एवढ्याशा कारणामुळे तिने त्या पुरुषाच्या कानाचा लचका तोडला…

जुनागडमधील बेकायदेशीर दर्गा जमीनदोस्त

भारत पेट्रोलियमची जेतेपदाची हॅटट्रिक

हिंदूविरोधी प्रतिमा बदलण्यासाठी ममतांकडून रामनवमीला सार्वजनिक सुट्टी

पक्षात प्रवेश केल्यानंतर लालचंद कटारिया म्हणाले की, अंतरात्माच्या आवाजामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. आगामी निवडणुकीत भाजपला पुढे नेणार असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगात ओळख मिळवून दिली आहे, ते पुढे म्हणाले.दरम्यान, भाजपमध्ये दाखल झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यात दोन माजी मंत्री आणि चार माजी आमदारांचा समावेश आहे.

या नेत्यांशिवाय माजी आमदार रामनारायण किसन, काँग्रेस नेते अनिल व्यास, निवृत्त आयएएस औंकरसिंग चौधरी, गोपालराम कुकुना, अशोक जांगीड, प्रिया सिंग मेघवाल, प्रदेश काँग्रेस सेवादलाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुरेश चौधरी, राजेंद्र पारसवाल, शैतान सिंग मेहरा, रामनारायण राणे आदी उपस्थित होते. झाझरा, माजी प्रधान जगन्नाथ बुरडक, कर्मवीर चौधरी, कुलदीप देवा आणि बच्चू सिंग चौधरी यांचाही समावेश आहे. त्यांच्यासोबत रामलाल मीणा, महेश शर्मा, रणजित सिंह, मधुसूदन शर्मा, सुनीता चौधरी, मदनलाल अटवाल, प्यारेलाल शर्मा, महेश शर्मा, रामखिलाडी शर्मा, रुघाराम माहिया आणि भिन्याराम पेडीवाल यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा