27 C
Mumbai
Saturday, September 14, 2024
घरविशेषजुनागडमधील बेकायदेशीर दर्गा जमीनदोस्त

जुनागडमधील बेकायदेशीर दर्गा जमीनदोस्त

Google News Follow

Related

गुजरातच्या जुनागड महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण कारवाई करत शहरातील माजेवाडी गेटजवळील वादग्रस्त दर्गा जमीनदोस्त केला आहे. हा दर्गा बेकायदेशीरपणे बांधण्यात आला होता. यासह अन्य धार्मिक अतिक्रमणे सुद्धा हटवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे हा दर्गा गेल्या वर्षी झालेल्या दंगलीचा केंद्रबिंदू ठरला होता. अतिक्रमण हटावची नोटीस दिल्यानंतर मुस्लीम जमावाने तिथे गोंधळ घातला होता.

माजेवाडी दरवाजाजवळ हा दर्गा होता. जुनागड महापालिकेच्या पथकाने रात्री बुलडोझरची कारवाई करून दर्गा हटवला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या ही जागा पूर्णपणे रिकामी करण्यात आली असून तेथील मलबाही रात्रीत नेण्यात आला आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. सुमारे एक हजार पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहाटे २ वाजता दर्गा पाडण्याची कारवाई सुरू झाली. पहाटे ५ वाजेपर्यंत दर्गा परिसर पूर्णपणे सपाट झाल्याने संपूर्ण रस्ता मोकळा करण्यात आला. ३००-४०० मीटरचा बॅरिकेड आधीच उभारण्यात आले होते. माजवाडी दरवाजाजवळ सुमारे दोन दशकांपूर्वी बांधलेला हा दर्गा कालांतराने हळूहळू विस्तारत गेला होता. रस्त्याला अडथळा ठरणारा हा बेकायदेशीरपणे कब्जा केलेला दर्गा तोडण्याचे यापूर्वीही प्रयत् करण्यात आले होते.

हेही वाचा..

भारत पेट्रोलियमची जेतेपदाची हॅटट्रिक

हिंदूविरोधी प्रतिमा बदलण्यासाठी ममतांकडून रामनवमीला सार्वजनिक सुट्टी

लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घात, कार अपघातात सहा जणांचा मृत्यू!

इयत्ता दुसरीतल्या मुलाला हृदयविकाराचा झटका?

हा दर्गा हटवण्यासाठी महापालिकेने जून २०२३ मध्ये नोटीस बजावली होती. मात्र नोटीस मिळताच मुस्लिम जमाव दर्ग्याजवळ जमा होऊ लागला. रात्री पोलीस त्यांची समजूत घालण्यासाठी गेले असता मुस्लिम जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांवर जोरदार हल्ला केला होता. त्यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले होते. या प्रकरणानंतर दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये असे दिसून आले की, उन्माद जमावाने ‘अल्लाहू अकबर’ च्या घोषणा देत पोलिसांवर हल्ला केला. दरम्यान, एका एसटी बसलाही लक्ष्य करून दगडफेक करण्यात आली होती, अनेक वाहनेही जाळण्यात आली होती. या घटनेत एका निष्पाप हिंदूचा मृत्यू सुद्धा झाला होता.अखेर जुनागड प्रशासनाने हा वादग्रस्त दर्गा जमीनदोस्त केला आहे. याशिवाय तलावाच्या गेटजवळील जलाराम मंदिर आणि रेल्वे स्टेशन रोडवरील रामदेवपीर मंदिर हटवण्यात आले आहे. या बद्दल हिंदू समाजाने कायद्याचा आदर केला आहे. या सर्व कारवाया रात्री उशिरा झाल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून गुजरात सरकार अतिक्रमणांवर कारवाई करत आहे. परिणामी विविध ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे हटवण्यात आली आहेत. केवळ २४ तासांपूर्वी कच्छमधील खवडा येथे तीन अनधिकृत मदरसे जमीनदोस्त करण्यात आले. या बेकायदेशीरपणे उभारलेल्या संस्था हटवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने बुलडोझरचा वापर केला. याव्यतिरिक्त, शुक्रवार, ८ मार्च रोजी कुख्यात गुन्हेगार रज्जाक सैचा आणि त्याच्या भावाने जामनगरमध्ये बांधलेले दोन बेकायदेशीर बंगले खाली करण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला होता.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा