25 C
Mumbai
Wednesday, October 9, 2024
घरविशेषलग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घात, कार अपघातात सहा जणांचा मृत्यू!

लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घात, कार अपघातात सहा जणांचा मृत्यू!

जखमींवर उपचारासाठी जौनपूहून वाराणसीला रवाना

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून एका कार अपघाताची बातमी समोर आली आहे.हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आहे. कार आणि ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील जौनपूर इथे हा भीषण अपघात झाला.कार आजमगढहून जौनपूरला निघाली होती. तर ट्रक जौनपूरहून केराकतकडे निघाला होता.तेव्हा कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली.या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील एकूण ६ जण ठार झाले तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.जखमींना उपचारासाठी जौनपूहून वाराणसीला पाठवण्यात आले आहे.अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला तर ट्रक रस्त्याकडेला पलटी झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हे ही वाचा:

मनी लाँड्रिंग प्रकरणी छापा टाकत लालू यादव यांच्या निकटवर्तीयाला अटक!

शाहजहान शेखच्या अटकेनंतर आठ दिवसांनी संदेशखालीतील पोलिस ठाण्याच्या प्रभारीची बदली!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल!

पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सुट्टी!

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नासाठी मुलगी पाहायला हे कुटुंब बाहेर पडले होते.बिहारकडून प्रयागराजच्या दिशेने ते जात असताना कारचा अपघात झाला.या अपघातात अनिश गजाधर शर्मा, गजाधर लक्ष्मण शर्मा, जवाहर रामप्रताप शर्मा, गौतम जवाहर शर्मा, सोनम बजरंग शर्मा, रिंकू पवन शर्मा यांचा मृत्यू झाला.हे सर्व बिहारच्या सीतामढी इथले रहिवासी आहेत.

दरम्यान, या प्रकरणी केराकतच्या सीओंनी सांगितले की, अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अपघातग्रस्त कार आणि ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.ट्रक चालक आणि इतर दोघे फरार झाले आहेत.हा अपघात मध्यरात्री अडीचच्या सुमारास झाला आहे.अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
181,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा