27 C
Mumbai
Thursday, August 18, 2022
घरराजकारण‘काँग्रेसवाल्यांनो तुम्ही मोदीजींचे काहीही वाकडे करु शकणार नाहीत’

‘काँग्रेसवाल्यांनो तुम्ही मोदीजींचे काहीही वाकडे करु शकणार नाहीत’

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ५ जानेवारी रोजी सुरक्षेतील गंभीर त्रुटीमुळे पंजाबचा दौरा रद्द करावा लागला. यावरून देशभरातून काँग्रेस सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. या घटनेमुळे राजकीय वादंग निर्माण झाला असून याच पार्श्वभूमीवर कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी एक व्हिडीओ शेअर करत काँग्रेसवर संताप व्यक्त केला आहे.

‘नेहमी लक्षात ठेवा, जंगलातला वाघ एकदा जखमी झाला की, संपूर्ण जंगलात शांतता पसरते. अरे काँग्रेसवाल्यांनो तुम्ही मोदीजींचे काहीही वाकडे करु शकणार नाहीत. कारण, मोदीजींवर गुरु, गुरुनानक देव, बाबा विश्वनाथ, बाबा केदारनाथ, बाबा महाकाल यांचा आशिर्वाद आहे. खोट्या शेतकऱ्यांना पुढे करुन पंजाबची बदनामी का करत आहात? आपल्या पंतप्रधानांना अपमानित करत आहात. तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे,’ असे बोलून राजू श्रीवास्तव यांनी व्हिडीओमधून संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

महिलेच्या केसात थुंकणाऱ्या जावेद हबीबचा माफीनामा

प्लास्टिक द्या आणि चहा, वडापाव घ्या!

‘हे तर पंजाबमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे लक्षण’

मुंबई पालिकेकडून गृह विलगीकरणासाठी नवी नियमावली जाहीर… वाचा सविस्तर

पंजाबमधील फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे नरेंद्र मोदी हे भटिंडामधील पुलावर १५ ते २० मिनिटे अडकून पडले होते. त्यानंतर मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. पंजाब दौऱ्यात मोदींच्या हस्ते ४२ हजार ७५० कोटींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार होता. या घटनेची दखल गृहमंत्रालयाकडून घेण्यात आली असून त्यांनी पंजाब सरकारकडून याचा अहवाल मागितला असून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,912चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा