29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणशिवसेना नेते रामदास कदम यांचा राजीनामा

शिवसेना नेते रामदास कदम यांचा राजीनामा

Google News Follow

Related

शिवसेनेला खिंडार पडण्याची मालिका सुरूच असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत त्यांनी नेतेपद सोडण्याचे ठरविले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेतेपदी माझी नियुक्ती केली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या पदाला काहीच अर्थ राहिला नाही, असं रामदास कदम म्हणाले. माझ्यावर अनेकदा टीका करण्यात आली. मातोश्रीवर बोलावून सांगितलं की, मीडियासमोर जायचं नाही. एवढेच नाही तर मला आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम याला वारंवार अपमानित करण्याचा प्रयत्न पक्षातून झाला,” असा आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

हे ही वाचा:

इंदूरहून महाराष्ट्रात येणारी बस नर्मदेत कोसळली; १३ मृत्यू

“सभागृह म्हणजे लोकशाहीचं तीर्थक्षेत्र”

भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला

अमेरिकेतील इंडियाना स्टेट मॉलमधल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

रामदास कदम हे २००५ ते २००९ पर्यंत विरोधी पक्षनेते होते. २००५ मध्ये त्यांची शिवसेना नेतेपदी निवड झाली. २०१० मध्ये रामदास कदम विधानपरिषदेवर निवडून गेले. २०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांना पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. शिवसेनेचा कोकणातील चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा