26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरक्राईमनामाभाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला

भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला

Related

मिरारोडमध्ये भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी असलेल्या महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवार, १७ जुलै रोजी रात्री अज्ञातांनी महिला पदाधिकारी सुल्ताना खान यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत.

रविवारी रात्री सुल्ताना या त्यांच्या पतीसोबत कारने कामानिमित्त बाहेर जात होत्या. दरम्यान, मिरारोड मधील नया नगर जवळ दुचाकी वरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांची गाडी अडवली. हे तरुण तोंडाला रुमाल बांधून आले होते. त्यानंतर या तरुणांनी गाडीवर हल्ला केला. तसेच धारदार वस्तूने सुल्ताना यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सुल्ताना यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

या हल्ल्यानंतर सुल्ताना खान यांच्या पतीने त्यांना तात्काळ मिरारोडच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तिथे त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आलं.

हे ही वाचा:

अमेरिकेतील इंडियाना स्टेट मॉलमधल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

१६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान

इंडोनेशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू

प्रतीक्षा संपली!! नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग ‘या’ तारखेपासून सुसाट

फेसबुक अकाउंट वरुन ४ जुलै रोजीच्या एका व्हिडिओमध्ये सुल्ताना खान यांनी मुंबईच्या पदाधिकारी कडून धमकी येत असल्याच सांगितलं होतं. त्यांचा पूर्वीचा व्हिडीओ कुणीतरी डिलीट केल्याचंही बोललं जातंय. ‘ना डरी हूँ… ना डरूँगी’ सुल्ताना खान यांनी आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर हा हल्ला झाल्याने पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा