30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारण१६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान

१६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान

Google News Follow

Related

देशाच्या १६व्या राष्ट्रपतीपदासाठी आज, १८ जुलै रोजी मतदान पार पडणार आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात ही लढत होणार आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ४ हजार ८०९ लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार असेल. लोकसभेचे ५४३ खासदार, राज्यसभेचे २३३ खासदार आणि ४ हजार ३३ विविध राज्यांमधील आमदारांमधून नव्या राष्ट्रपतींची निवड होईल. एकूण ४ हजार ८०९ लोकप्रतिनिधींच्या मतांचे मूल्य हे १० लाख ८६ हजार ४३१ एवढे आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील ७७६ खासदारांच्या प्रत्येक मताचे मूल्य हे ७०० एवढे असेल. खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५ लाख ४३ हजार २०० आहे. विविध राज्यांमधील आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य हे ५ लाख ४३ हजार २३१ एवढे आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना विविध पक्षांचा पाठिंबा लाभला आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली तेव्हा भाजपकडे ५० टक्क्यांच्या आसपास मते होती. पण, आदिवासी समाजातील महिला उमेदवार म्हणून विविध राजकीय व प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा जाहीर केल्याने मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळण्याची शक्यता आहे.

द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबरच बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, जनता दल धर्मनिरपेक्ष, अण्णा द्रमुक, अकाली दल, शिवसेना, बसप, तेलुगू देसम, झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यशवंत सिन्हा यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पार्टी, द्रमुक, तेलंगण राष्ट्र समिती यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

हे ही वाचा:

इंडोनेशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू

प्रतीक्षा संपली!! नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग ‘या’ तारखेपासून सुसाट

शेलार म्हणाले, ख्वाजा चिस्तीच्या हत्या प्रकरणाची चौकशी करा!

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात कट रचल्याप्रकरणी पीएफआय सदस्याला अटक

या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचा पाठिंबा आहे.  त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकता उरली असून, देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी समाजाच्या नेत्या २५ तारखेला सर्वोच्च पदावर विराजमान होतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा