26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरक्राईमनामाशेलार म्हणाले, ख्वाजा चिस्तीच्या हत्या प्रकरणाची चौकशी करा!

शेलार म्हणाले, ख्वाजा चिस्तीच्या हत्या प्रकरणाची चौकशी करा!

Related

नाशिक मध्ये अफगाणी नागरिक ख्वाजा चिस्तीच्या हत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार आणि नेते अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे. या संदर्भात शेलार यांनी स्वत: डीजीपी यांना पत्र लिहिले आहे.

नाशिकजवळच्या येवल्यामध्ये ख्याजा सैय्यद शरीफ चिश्ती या ३५ वर्षांच्या मुस्लीम धर्मगुरुला सूफी बाबा म्हणून ओळखले जायचे. ख्वाजा चिस्ती अफगणिस्तानातून भारतात येऊन राहत होते. जुलैच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमधील चिंचोडी भागात त्यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर चार अज्ञात व्यक्ती चार चाकी वाहनातून फरार झाले. आर्थिक वादातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा संशय आहे.

हे ही वाचा:

मुंबईतील खड्डे बुजवण्याचे काम २४ तास सुरू ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

‘संजय राऊत यांना शिजोफेर्निया झाला आहे’

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची सिंगापूर ओपनमध्ये बाजी

“संजय राऊतांनी शांततेचा पवित्रा घेऊन शिंदे- ठाकरेंना एकत्र आणावं”

या हत्येप्रकरणी प्रसार माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर अ‍ॅड शेलार यांनी या प्रकरणी डीजीपींना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये शेलार यांनी, या अफगाणी नागरिकाने भारत आणि नाशिकमध्ये कोणत्या मालमत्ता खरेदी केल्या का आणि त्यासाठी कोणाकडून आणि किती पैसे जमवले, यामध्ये मनी लॉंड्रिंग झाले आहे का , इन्कम टॅक्सच्या नियमांचा भंंग झाला आहे का, त्याने जमवलेल्या पैशामध्ये काही गुन्हेगारांचा हात आहे का, याची चौकशी झाली पाहिजे. ही सगळी चौकशी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या काळात लपवली जायची त्याची आता एसआयटी मार्फत करावी, अशी मागणी करणारे पत्र आपण स्वत: डीजीपी यांना लिहिले असल्याचे अ‍ॅड. शेलार यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,919चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
14,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा