27 C
Mumbai
Wednesday, August 17, 2022
घरराजकारण“संजय राऊतांनी शांततेचा पवित्रा घेऊन शिंदे- ठाकरेंना एकत्र आणावं”

“संजय राऊतांनी शांततेचा पवित्रा घेऊन शिंदे- ठाकरेंना एकत्र आणावं”

Related

दोन दिवसांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चेसाठी एकत्र येणार असल्याचं ट्वीट शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केलं आहे. या ट्वीटमुळे राजकीय वर्तृळात खळबळ उडाली आणि चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर दिपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचे मत मांडले.

“शिवसेना एक गट म्हणून हवा आणि त्यासाठी मध्यस्तीची भूमिका घेत असल्याचे दिपाली सय्यद म्हणाल्या. शिवसेनेत दोन गट नकोत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन एकत्र यावं. आम्ही फक्त कार्यकर्ते आहोत. मला जे वाटलं ते मत मी मांडलं,” असे दिपाली सय्यद म्हणाल्या.

“सगळ्यांनी एकत्र येण्यात शिवसेनेचं हित आहे. आमदार, कार्यकर्त्यांच्या मनात आहे. मात्र, कोणीही बोलत नाही. शांतपणे चर्चा केल्यास एकत्र येता येईल. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे अजूनही प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेंनीही सांगितलं आहे की, मातोश्रीची दारं खुली आहेत,” असं दिपाली सय्यद म्हणाल्या. “उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते दोन दिवसात भेटतील आणि हे लवकरच दिसेल,” असं सूचक वक्तव्यही दिपाली सय्यद यांनी केलं.

हे ही वाचा:

इंडिगो विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग

इंडोनेशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू

ठाणे शहराला अतिरिक्त पाण्यासाठी मंजुरी

उद्धव ठाकरेंना धक्का; खासदार राजेंद्र गावित यांच्यासह ५०- ६० शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंसोबत

“खासदार संजय राऊत हे बेधडक बोलतात. त्यांची बोलण्याची, भूमिका मांडण्याची ती पद्धत आहे. त्यांना शिवसेनेला पाठींबा द्यायचा असतो. तरी संजय राऊत यांनी थोडा शांततेचा पवित्रा घ्यावा आणि पुढाकार घेऊन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणावं,” असा सल्ला दिपाली सय्यद यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,914चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा