28.3 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरक्राईमनामापंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात कट रचल्याप्रकरणी पीएफआय सदस्याला अटक

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात कट रचल्याप्रकरणी पीएफआय सदस्याला अटक

Google News Follow

Related

उत्तर प्रदेश अँटी टेररिस्ट स्क्वॉड आणि बिहार पोलिसांच्या संयुक्त पथकाने शनिवार, १६ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित कार्यक्रमात अशांतता निर्माण करण्याच्या दहशतवादी कटाशी संबंधित एका प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) सदस्याला अटक केली आहे. नुरुद्दीन जंगी असे आरोपीचे नाव असून लखनौ येथून त्याला अटक करण्यात आली आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा सक्रिय सदस्य नुरुद्दीन जंगी उर्फ ​​वकील नुरुद्दीन याला एटीएस आणि बिहार पोलिसांच्या संयुक्त पथकाने आलमबाग येथून अटक केली. नुरुद्दीन आणि त्याचे सहकारी बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित दौऱ्याच्या कार्यक्रमात अडथळा आणण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणही दिलं जात होतं.

एडीजी एटीएस नवीन अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणाच्या पोलिस अधीक्षकांनी पत्र लिहून आरोपीला अटक करण्यासाठी मदत मागितली होती. बिहार पोलिसांचं एक पथक लखनौला आलं होतं. पथकाने आरोपींची माहिती शेअर केली. यानंतर एटीएसने नुरुद्दीनला आलमबागमधील मवैया रेल्वे स्थानकाजवळून ताब्यात घेतलं. तर नुरुद्दीन हा चारबाग इथं राहत होता.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना दणका; ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती

इंडोनेशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू

ठाणे शहराला अतिरिक्त पाण्यासाठी मंजुरी

उद्धव ठाकरेंना धक्का; खासदार राजेंद्र गावित यांच्यासह ५०- ६० शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंसोबत

चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, २०१५ मध्ये तो पीएफआय दरभंगा जिल्हा अध्यक्ष सनाउल्लाहच्या संपर्कात आला होता. त्यानंतर तो पीएफआय आणि एसडीपीआयमध्ये सामील झाला आणि तेव्हापासून नुरुद्दीन पीएफआयचा सक्रिय सदस्य आहे. २०२० मध्ये नुरुद्दीननं SDPI च्या बॅनरखाली दरभंगा विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. त्यानंतर आरोपीला सहाशे मतं मिळाली. आरोपीनं सांगितलं की, त्यानं २०१७ मध्ये सीएम लॉ कॉलेज, दरभंगा येथून एलएलबीची पदवी घेतली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा