27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरविशेषइंडिगो विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग

इंडिगो विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग

Related

इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग पाकिस्तानमधील कराचीत करण्यात आले आहे. हे विमान शारजाहून हैदराबाद येथे जात होते. विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. मागील दोन आठवड्यात दुसऱ्यांदा भारतीय विमानाला कराचीत एमर्जन्सी लँडिंग करावी लागली.

इंडिगो एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, शारजा- हैदराबाद विमानात पायलटला विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानाला कराचीच्या दिशेने वळवण्यात आले. त्यानंतर विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. त्यानंतर या प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

इंडोनेशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू

ठाणे शहराला अतिरिक्त पाण्यासाठी मंजुरी

उद्धव ठाकरेंना धक्का; खासदार राजेंद्र गावित यांच्यासह ५०- ६० शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंसोबत

रुबैय्या सईदने यासिन मलिकला अपहरणकर्ते म्हणून ओळखले

दरम्यान, ५ जुलै रोजीदेखील स्पाइसजेट विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती. स्पाइसजेटचे हे विमान दिल्लीहून दुबई येथे जात होते. तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाला पाकिस्तानमधील कराचीत लँडिंग करावी लागली. तर १४ जुलै रोजी देखील जयपूरमध्ये इंडिगो विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा