28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारण'संजय राऊत यांना शिजोफेर्निया झाला आहे'

‘संजय राऊत यांना शिजोफेर्निया झाला आहे’

Google News Follow

Related

शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या विजय शिवतारे यांनी केला घणाघात

शिवसेनेविरोधात केलेल्या शिस्तभंगाबद्दल शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर या सगळ्या परिस्थितीला संजय राऊत हेच जबाबदार असून त्यांना मानसिक विकार झाल्याची टीका शिवतारे यांनी केली आहे. शिजोफेर्निया या विकाराने राऊत यांना ग्रासल्याचे शिवतारे म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, २९ जूनला पीसी घेऊन पुण्यात मीडियासमोर मी भीमिका मांडली होती. त्यात म्हटले होते की, महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. उद्धव यांनी या महाविकास आघाडीशी फारकत घ्यावी. एकनाथ शिंदेंचीही तीच इच्छा होती. मी ही भूमिका घेतली तेव्हा माझी हकालपट्टी केली. पण मीच शिवसेना सोडली आहे. संजय राऊत यांनीच हे घडविले आहे. संजय राऊत यांची भक्ती शरद पवारांशी किती आहे हे सांगण्याची गरज नाही.

शिवतारे म्हणाले की, मेडिकल टर्ममध्ये स्क्रीझोफेनिया हा रोग असतो. त्या व्यक्तीला बाकी प्रॉब्लेम नसतो. हुशार माणसाला हा रोग होतो बाकी कुणाला होत नाही. अतिविचारामुळे तो होतो. भास होतात. राऊत यांना गोव्यात आमच्याशिवाय सरकार होणार नाही, असा भास झाला. पण नोटापेक्षा पण कमी मते मिळाली. शिवसेनेची नामुष्की झाली. यूपीत हिंदुत्वाचा झेंडा फडकावण्याचे स्वप्न बघत १३९ उमेदवार उभे केले. सगळ्यांची डिपॉझिट जप्त झाली. नंतर तर दिल्ली काबीज करू असे ते म्हणू लागले. उद्धव ठाकरे पंतप्रधान बनतील असे ते म्हणत होते. असे चुकीचे विचार त्यांनी बिंबवले. त्यातून हे सगळे घडले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात कट रचल्याप्रकरणी पीएफआय सदस्याला अटक

मुंबईतील खड्डे बुजवण्याचे काम २४ तास सुरू ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना दणका; ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती

ठाणे शहराला अतिरिक्त पाण्यासाठी मंजुरी

 

मी अनेक पत्रे उद्धव यांना लिहिली पण काहीही उत्तर नाही. आढळरावांची हकालपट्टी केली. मग पुन्हा घेतले. दोन दिवसांनी बोलावले. पुण्यातून लढाअसे त्यांना सांगण्यात आले. १५-१८ वर्षे जो शिरूर मतदारसंघातून लढला. त्यांना पुण्यातून लढायला सांगितले. याला काय म्हणायचे, असा सवालही शिवतारे यांनी उपस्थित केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा