33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारण'गांधी हत्येचे धागेदोरे हे काँग्रेसपर्यंत पोहोचतात'

‘गांधी हत्येचे धागेदोरे हे काँग्रेसपर्यंत पोहोचतात’

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकरांचा घणाघात

Google News Follow

Related

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर राहुल गांधी यांनी बदनामीकारक वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्र ढवळून निघाला. यासंदर्भात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या त्यांच्या मुलाखतीतून समाचार घेतला.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी धारदार उत्तरे देत सावरकर द्वेष्ट्यांना सुनावले.

महात्मा गांधींचे पणतु तुषार गांधी यांनी जो आरोप केला होता, त्यानुसार सावरकरांनी नथुराम गोडसेंना पिस्तुल दिल्याचे म्हटले होते. त्यावर रणजित सावरकर म्हणाले की, हा बिनबुडाचा आरोप आहे. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी जगदीश गोयल यांनी सांगितले होते की, हे पिस्तुल त्याला नाथिलाल जैन नावाच्या व्यक्तीने दिले होते आणि ते इटालियन सेनेचे होते. नाथिलाल जैनला पोलिसांनी अटक केली होती. पण या जैनला न्यायालयासमोर आणले नाही कारण तो काँग्रेसच्या मंत्र्याचा मेहुणा होता. हे ऑन रेकॉर्ड आहे. त्यामुळे याची तार काँग्रेसशी जुळते.

हे ही वाचा:

बेलापूरहून अलिबागला जा आता वॉटर टॅक्सीने

उद्धव ठाकरे नैराश्यातून हे बोलत आहेत…

‘डीजे स्नेक’ कार्यक्रमात चाहत्याना चोरांचा दंश

अभिनेते पुनीत इस्सार ह्यांना १३ लाखांनी लुटले

 

स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या क्रांतिकारकांवरून, देशभक्तांवरून वाद निर्माण केले जात आहेत, त्यांना या वादात ओढले जात आहे. त्यावर रणजित सावरकर म्हणाले की, यातच त्याचे उत्तर सामावले आहे. ज्यांनी योगदान दिले त्यांना श्रेय तुम्ही देऊ इच्छित नाही. ज्यांनी कष्ट घेतले, बलिदान दिले त्यांची दखल घेतली जात नाही. जर तुम्ही त्यांच्या विचारांशी सहमत नसाल तरी हरकत नाही. पण त्यांच्यावर चिखलफेक का केली जाते? गेल्या २० वर्षांपासून असे होत आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले तेव्हापासून हे सुरू आहे. २०१०मध्ये जेव्हा काँग्रेस सरकार होते तेव्हा हे बंद झाले होते पण मोदी सरकार आल्यानंतर पुन्हा याला सुरुवात झाली. स्पष्टच आहे की, सावरकरांचा उपयोग राजकारणासाठी केला जात आहे. त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केल्यावर आपल्याला मतांचे ध्रुवीकरण करता येईल, हा होरा आहे.

२०००मध्ये असा आरोप केला गेला की, कपूर आयोगाने गांधी हत्येत सावरकरांना दोषी मानले होते. तर तो आरोप खोटा आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, सावरकरांना कपूर आयोगाने दोषी मानलेले नाही. कपूर आयोगाचा अहवाल वाचला की स्पष्ट होईल. महात्मा गांधी यांचा जीव वाचविण्यात काँग्रेस कशी अपयशी ठरली याची उलट या अहवालात माहिती आहे.

तथाकथित माफीनाम्याबाबत रणजित सावरकरांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, सच्चिदानंद सान्याल यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. १९१३ ते १९१९पर्यंत ते तुरुंगात होते नंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यांनीही आपल्या सुटकेसाठी याचिका केली होती. पण सावरकरांना सुटका करण्यात आली नाही. कारण इंग्रजांना भीती होती की, सावरकरांना सोडले तर ते पुन्हा महाराष्ट्रात क्रांतीची मशाल पेटवतील. १० वर्षे तुरुंगात राहणारे सावरकर एकमेव क्रांतिकारक होते. १९२४ला जेव्हा त्यांची सुटका झाली तेव्हा त्यांना रत्नागिरीत त्यापेक्षाही छोट्या कोठडीत ठेवण्यात आले. गांधींना १९२२ला अटक करण्यात आली होती पण १९२४ला सोडण्यात आले. त्यांनी राजकारणात भाग घेऊ नये असे गांधींना कोणीही अट घातली नाही. पण सावरकरांना तशी अट घालण्यात आली. गांधींनी घरघर चरखा, दारूबंदी, अस्पृश्यता निवारण असे कार्यक्रम राबवले तर सावरकरांनी अस्पृश्यता मिटविण्यासाठी आपल्याला मुळावर प्रहार करावा लागेल, असे म्हटले. जातीभेद दूर करण्याची त्यासाठी गरज असल्याचे सावरकर म्हणत. त्या उलट गांधीजी हे चातुर्वर्ण्य, जातीभेदावर विश्वास ठेवत असत. त्यावर डॉ. आंबेडकरांनीही टीका केलेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा