29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरक्राईमनामाबलात्कार पीडितांची आई 'या' मुख्यमंत्र्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात

बलात्कार पीडितांची आई ‘या’ मुख्यमंत्र्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात

Google News Follow

Related

सध्या केरळसह देशातील ५ राज्यांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यात केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाने जोर लावलेला दिसत आहे. मात्र, केरळमध्ये बलात्कार आणि नंतर हत्या झालेल्या २ मुलींच्या आईने दाद मागूनही न्याय न मिळाल्याने थेट मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. पीडित महिलेने मंगळवारी (१६ मार्च) धर्मदममधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या दोन मुलींवर २०१७ मध्ये बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर घरातच फाशी घेतलेल्या स्थितीत मृत आढळल्या होत्या. यानंतर वारंवार दाद मागूनही मुलींना न्याय न मिळाल्याचा आरोप पाडित महिलेने केला आहे.

“मला माझ्या मुलींसीठी न्याय हवा आहे. मी तिरुवनंतपुरममध्ये मुख्यमंत्र्यांना भेटले आणि रडले, माझ्या मुलींच्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून विनंती केली. मात्र, त्यांच्याकडून दोषींवर कारवाई केली गेली नाही. त्यामुळेच मी मुख्यमंत्री विजयन यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.”

हे ही वाचा:

आनंदी जीवनाचे रहस्य ‘इकिगाई’

भाजपाच्या ‘या’ खासदाराची आत्महत्या?

माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दुसऱ्यांदा निवडून येण्याच्या आशेने धर्मदरमधून अर्ज भरलाय. मात्र, त्यांच्यासमोर भाजपासोबतच इतर पक्ष आणि या पीडित महिलेचं कडवं आव्हान असणार आहे. धर्मदममधून भाजपाने प्रदेशाध्यक्ष के. पद्मनाभन यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफ आघाडीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही.

पीडित मुलींच्या आईने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या २ पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात सरकारकडून कारवाई न झाल्यानं मुंडण केलं होतं. त्यांनी या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी केरळमध्ये कासरगोड ते तिरुवनंतपुरम अशी निती यात्रा सुरु केली आहे. ती यात्रा ४ एप्रिल रोजी संपणारा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा