28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरअर्थजगतभारताच्या परकीय चलन साठ्यात विक्रमी वाढ!

भारताच्या परकीय चलन साठ्यात विक्रमी वाढ!

Google News Follow

Related

भारताकडच्या परकीय चलनात २.५६३ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. यासोबतच भारताच्या परकीय गंगाजळीने ५८१. १३१ अब्ज डॉलर्सचा नवा उच्चांक गाठला आहे. ११ डिसेंबर रोजी भारतीय रिजर्व्ह बँकेने प्रकाशित केलेल्या साप्ताहिक पुरवणीत हे माहिती समोर आली आहे.

भारताच्या विदेशी चलन साठयात परकीय चलनातील गुंतवणूक, सुवर्ण साठा, स्पेशल ड्रॉईंग राईट्स आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील साठा या गोष्टींचा समावेश होतो. भारताच्या परकीय चलन गुंतवणूकीत १.३८२ अब्ज डॉलर्स वाढ झाली असून सुवर्णसाठा १.००८ अब्ज डॉलर्सनी वाढला आहे.

स्पेशल ड्रॉईंग राईट्समध्ये १२ अब्ज डॉलर्सची बढत झाली आहे तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील साठ्यात  १६० अब्ज डॉलर्सची भर पडली आहे.

भारताच्या परकीय चलन साठ्यात झालेली वाढ भारतीय निर्यात वाढीचे प्रतीक आहे. कोविड काळात जगाची अर्थव्यवस्था कठीण परिस्थितून जात असताना परकीय चलन साठा वाढणे सकारात्मक मानले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा